पदाधिकाऱ्यांना शहर विकासाचे अधिकार, भाजपशी युती करण्याचे नाही; जलीलांनी स्पष्टच सांगितलं
Imtiaz Jalil यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेमध्ये थेट भाजप आणि एमआयएमची युती झाली होती. यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
Imtiaz Jalil on BJP AIMIM allaince in Akot Corporation : राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाने कुणाचाही हात हाती घेतल्याने मतदारांच्या भुवया उंचावत आहेत. त्यात अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मात्र थेट भाजप काँग्रेसची युती झाली होती. तर अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेमध्ये थेट भाजप आणि एमआयएमची युती झाली होती. यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
अकोटमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना शहराच्या विकासासाठी काही अधिकार दिले होते. पण याचा अर्थ असा नाही की, ज्या भाजपच्या विरूद्ध आम्ही राजकारण करतो. त्या भाजपशी युती केली जाईल. अशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. भाजप सोबत कुठेही युती होणार नाही. विकास नाही झाला तरी चालेल तो आमच्यासाठी दुसरा मुद्दा आहे पण जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. असं म्हणज जलील यांनी भाजप एमआयएम युतीवर आपली परखड भूमिका मांडत कारवाईचा इशारा दिला आहे.
श्री काळभैरवनाथ चरणी नारळ फोडून भाजपच्या श्रुती वाकडकर यांचा दणदणीत प्रचारारंभ
दुसरीकडे विधानसभेत ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट ‘एमआयएम’शी आघाडी केल्याने मोठं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या युतीमुळे विधानसभेतील नाऱ्याचा भाजपलाच विसर पडला आहे का? असा प्रश्न भाजप अन् एमआयएमच्या अकोटमधील आघाडीमुळे उपस्थित केला जात आहे. अकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे पक्षाने एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली आहे. तर, दुसरीकडे अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमधील एमआयएमसोबतची कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नसून, ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाईचा थेट इशारा फडणवीसांनी दिला आहे.
