मनसे उमेदवाराला उद्धव ठाकरेंची भेट; सेना-भाजपच्या जोरदार घोषणाबाजीने राडा बोरीवलीमध्ये तणाव

Uddhav Thackeray यांच्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झाला. वेळी शिंदे गट भाजपसह मनसेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray meets MNS candidate Tension eased after Sena-BJP’s sloganeering in Borivali : मुंबई महापालिकेची निवडणूक जोरदारर सुरू आहे. प्रचारही रंगात येताना दिसत आहे. (Thackeray) अनेक दिवसांनंतर ही निवडणूक होत आहे. यावेळी या निवडणुकीकडं वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. कारण, दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र लढत आहेत. यामध्ये रविवारी उद्धव यांच्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिंदे गट भाजप सह मनसेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज मागाठणे विधानसभेतील प्रभाग क्रमांक ११ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) शिवशक्तीच्या उमेदवार कविता राजेंद्र माने ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला भेट देऊन… <a href=”https://t.co/XV1MzvtLzJ”>pic.twitter.com/XV1MzvtLzJ</a></p>&mdash; ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) <a href=”https://twitter.com/ShivSenaUBT_/status/2007820027777708182?ref_src=twsrc%5Etfw”>January 4, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

नेमकं काय घडलं?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा आणि भेटीगाठींचा धडाका लावला आहे. त्यामध्ये त्यांनी रविवारी रात्री बोरीवली येथे मनसेच्या उमेदवाराच्या कार्यालयाला भेट दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र येथून निघत असताना त्याच वेळी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराची एक प्रचार रॅली याठिकाणहून गेली. त्यातील सेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी गाडीतून जात असेलेल्या उद्धव ठाकरेंना उद्देशून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

अकोल्यामध्ये एमआयएमच्या सभेत मोठा राडा; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, ओवेसींनी घेतला काढता पाय

दरम्यान रविवार (दि. 4 जानेवारी)रोजी मुंबईतील शिवसेना भवताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आपला संयुक्त वचननामाशिवशक्ती’ नावाने जाहीर केला. या कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीने या जाहीरनाम्यात स्वस्त घरं उपलब्ध करून देणं, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे आश्वासन दिलं आहे. याशिवाय, ७०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचं, तसंच पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेला एक पार्किंग जागा देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.

follow us