अकोल्यामध्ये एमआयएमच्या सभेत मोठा राडा; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, ओवेसींनी घेतला काढता पाय

MIM meeting in Akola यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि मोठी धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला.

MIM Meeting In Akola

Big ruckus at MIM meeting in Akola Police lathicharge on activists, Owaisi takes a step back : सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता पक्षांकडून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. यासाठी एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांची अकोल्यामध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. सभेच्या स्टेजवळ अचानक मोठी गर्दी जमली. यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि मोठी धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला.

नेमकं काय झालं?

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएम या पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवेसी हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी एक सभा आयोजित करण्यात आली. गंडकी भागातील झुल्फीकार आली मैदानावर ही सभा आयोजित केली होती. मात्र यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने या ठिकाणी अनियंत्रित गर्दी झाली. तर सभा संपल्यानंतर सर्वच उपस्थितांनी स्टेज जवळ गर्दी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे आका; महाराष्ट्र काँग्रेसचा खळबळजनक आरोप

या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला. मात्र हा गोंधळ झाल्याचे लक्षात येतात ओवेसींनी या सभेतून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ओवेसी यांना पोलिसांच्या गराड्यातून कारमध्ये बसून सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. तसेच जमावाने घातलेल्या गोंधळ आणि चेंगराचेंगरीसाठी अनेक उपस्थित आणि कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला.

ही लढाई कार्यकर्त्याविरुद्ध नेत्याची, एक कार्यकर्ता कसा लढतोय हे सर्वांना दाखवायचंय; अमोल बालवडकरांचा निर्धार

दरम्यान अकोला महानगरपालिकेसाठी एमआयएम कडून 37 जागांवर निवडणूक लढविण्यात येत आहे. या अगोदर या महानगरपालिकेमध्ये एमआयएमचा एक नगरसेवक होता. तसेच या सभेमध्ये ओवेसी यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाजपला मुस्लिमांचा राग आहे. कारण अकोल्यामध्ये जन्म आणि मृत्यू दाखला देणे देखील बंद करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीसांच मुस्लिमांना बाबत एवढं डोकं का दुखतं? असावा नाही यावेळी ओबीसी यांनी केला आहे.

follow us