Video : इराणच्या सरकारी मीडिया ऑफिसवर इस्रायलचा हल्ला, अँकर लाईव्ह शो सोडून पळाली

Israel Attacks On Iran :  गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल

Israel Attacks On Iran

Israel Attacks On Iran :  गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल हल्ले करत आहे. आज इस्त्रायलकडून (Israel) पुन्हा एकदा इराणवर जोरदार हवाई हल्ला करण्यात आला आहे. यावेळी इस्त्रायलकडून इराणच्या सरकारी मीडिया चॅनेल आयआरआयबी (IRIB) ला टार्गेट करण्यात आले आहे. या चॅनेलवर लाईव्ह बुलेटिन सुरु असताना इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला आहे. हल्ला होताच बुलेटिन वाचणारी अँकरने तिकडून पळ काढला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे तेहरानमध्ये असणाऱ्या सर्व रेडिओ स्टेशनला आणि टीव्ही चॅनेलला टार्गेट करणार असल्याची धमकी इस्त्रायलकडून देण्यात आली आहे.

दोन्ही देशांकडून गेल्या चार दिवसांपासून एकमेकांवर हल्ले सुरु आहे. इस्त्रायलकडून इराणची (Iran) राजधानी तेहरानला (Tehran) टार्गेट करण्यात येत आहे तर इराणकडून इस्त्रायलची राजधानी तेल अवीव (Tel Aviv) आणि हैफा (Haifa) शहराला टार्गेट करण्यात येत आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला इस्त्रायली एअर डिफेन्स सिस्टिम रोखण्यास अयशस्वी झाल्याने इस्त्रायला मोठा नुकसान सहन करावा लागला आहे.

तर आता इस्त्रायलकडून इराणच्या सरकारी मीडिया चॅनेलवर टार्गेट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यापूर्वी इस्त्रायलकडून इराणच्या सरकारी मीडियाचा परिसर रिकामा करण्याचा इशारा देण्यात आला होता असा दावा टाईम्स ऑफ इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी असेही म्हटले होते की इराण ज्या माध्यमांद्वारे प्रचार करत आहे ते संपणार आहे.

Chandrakant Patil : विद्यार्थ्यांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

follow us