Israel Hamas War दरम्यान भारताचा इस्त्रायलला झटका; युनोमध्ये पॅलेस्टाईनला दिलं समर्थन
Israel Hamas War India Support Palestine instead of Israel : : इस्रायल आणि हमासमधील युद्ध (Israel Hamas War) आता शिगेला पोहोचलं आहे. गाझापट्टीत इस्त्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. या दरम्यान इस्त्रायलचं समर्थन करणाऱ्या भारताने ( India) इस्त्रायलला झटका दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीमध्ये भारताने इस्त्रायल ( Israel) आणि पॅलेस्टाईन ( Palestine ) हे दोन राज्य असावेत याला समर्थन दिलं आहे.
Panchayat: पंचायत सीझन 3 ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा ट्विस्ट, ‘या’ दिवशी होणार रिलीज
संयुक्त राष्ट्रातील देशाच्या स्थायी प्रतिनिधी रूचिरा कांबोज यांनी सांगितलं की, भारत इस्त्रायल ( Israel) आणि पॅलेस्टाईन ( Palestine ) हे दोन राज्य असावेत याला समर्थन देण्यासाठी कटीबद्ध आहे. जेणे करून पॅलेस्टीनी नागरिक सीमेच्या आत सुरक्षित राहू शकतील. भारताची ही भूमिका इस्त्रायलसाठी झटका मानला जात आहे.
वसंतदादांचं उदाहरण देत अजितदादांनी सांगितला पराभवाचा इतिहास
दुसरीकडे इस्त्रायल पॅलेस्टाईनचं अस्तित्व मान्य नाही. तसेच या अगोदर पॅलेस्टाईनने संयुक्त राष्ट्राचं सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र अमेरिकेच्या व्हेटोमुळे ते शक्य झाले नाही. मात्र त्यावर पुनर्विचार व्हावा. असं देखील भारताकडून म्हणण्यात आलं आहे. तसेच या बैठकीत भारताने हमासवर देखील नाराजी व्यक्त केली.
भारताने सांगितलं की, हमासने अगोदर 7 ऑक्टोबरला 2023 ला इस्त्रायलवर हल्ला केला. त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. भारत नेहमी दहशतवादाच्या विरोधात आहे. सर्व बंदीवानांना विनाशर्त सोडण्यात यावं. तसेच गाझामध्ये आंतरराष्ट्र्रीय कायदा आणि मानवी मुल्यांचं पालन केलं जावं. तसेच यावेळी भारताकडून पॅलेस्टाईनला आणखी मदत देण्याचं अश्वासन देखील दिलं. गाझातील मानवी मुल्य जपन्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संघटनाम करत असलेल्या प्रयत्नांचं भारत स्वागत करत आहे.