Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार

Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार

Israel’s attack on Gaza : इस्रायल आणि हमासमधी युद्ध (Israel Hamas War) आता शिगेला पोहोचलं आहे. गाझापट्टी (Gaza) इस्त्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा शनिवारी इस्त्रायलने दक्षिण गाझातील राफा शहरावर हल्ला केला. रात्रभराता केलेल्या या हल्ल्यात 14 मुलांसह 18 लोक ठार झाले. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत वाच्यता केली आहे. दरम्यान, अमेरिका (America) इस्रायललाब्जावधी डॉलर्सची अतिरिक्त लष्करी मदत देण्याची तयारी करत आहे.

Shivali Parab : अभिनेत्री शिवाली परबच्य हॉट अदा

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळं इजिप्तच्या सीमेजवळील राफा शहरावर इस्रायल जवळजवळ दररोज हवाई हल्ले करत आहे, जेथे गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. इस्रायलने शुक्रवारी रात्री देखील राफाच्या निवासी भागाला लक्ष्य केले. युनायटेड स्टेट्ससह इतर देशांनी संयम ठेवण्याचे आवाहन करूनही इस्रायल या शहरावर लष्करी कारवाई वाढविण्यावर ठाम आहे. शनिवारी केलेल्या या हल्ल्यात 14 मुलांसह 18 लोक ठार झाले.

Horoscope Today : ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

दरम्यान, या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो, असं म्हटलं.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने शनिवारी 26 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजची घोषणा केली. यात गाझाला मानवतेच्याआ धारावर $9 अब्जचाही समावेश आहे. इस्त्रायलने राफावर केलेल्या पहिल्या हल्लायत एक इसम, त्याची पत्नी मरण पावली. महिला गरोदर होती आणि तिच्या मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. कुवेती रुग्णालयाने सांगितले की, दुसऱ्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 13 मुले आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री राफा येथे झालेल्या हवाई हल्ल्यात सहा मुलांसह नऊ जण ठार झाले.

स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायल-हमास युद्धात 34,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि 79,000 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सुमारे दोन तृतीयांश महिला आणि मुले आहेत. गाझामधील दोन शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 80 टक्के लोकांनी आपली घरे सोडली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube