Israel-Hamas: हमास कमांडरने इस्रायलवर कसा रचला हल्ल्याचा कट, वाचा सविस्तर

Israel-Hamas: हमास कमांडरने इस्रायलवर कसा रचला हल्ल्याचा कट, वाचा सविस्तर

Israel-Hamas: गेल्या आठवड्यात हमासने केलेल्या भीषण हल्ल्याचे वर्णन इस्रायल 9/11 सारखा क्षण असे करत असेल, पण या हल्ल्यामागे ज्या व्यक्तीचं डोकं आहे, तो म्हणजे हमासचा दहशतवादी मोहम्मद दाईफ. या हल्ल्याला ‘अल अक्सा फ्लड’ असे नाव दिले आहे. शनिवारी, जेव्हा हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले, तेव्हा एक ऑडिओ टेप प्रसारित करण्यात आला ज्यामध्ये इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड व्यक्तीने हे नाव वापरले होते. यातून सूचित होते की हमासचा हल्ला जेरुसलेमच्या अक्सा मशिदीवरील इस्रायलच्या हल्ल्याचा बदला होता.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गाझामध्ये उपस्थित असलेल्या हमासच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे 2021 मध्ये इस्लामच्या तिसऱ्या पवित्र इमारतीवर म्हणजेच अल अक्सा मशिदीवर इस्रायली हल्ल्यानंतर मोहम्मद दाईफने हा हल्ला करण्याचा कट रचला होता. हमासच्या एका सूत्राने सांगितले की, इस्रायलने रमजानच्या महिन्यात अल अक्सा मशिदीवर हल्ला केल्याचे, उपासकांवर हल्ले करणे आणि त्यांना मारहाण करणे आणि मशिदींमधून वृद्धांना खेचून आणणे या दृश्यांनी मोहम्मद दाईफने संताप व्यक्त केला होता. आता, दोन वर्षांहून अधिक काळानंतर, हमासने केलेल्या हल्ल्याने इस्रायलला युद्ध घोषित करण्यास आणि बदला घेण्यास भाग पाडले.

राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; लग्न अन् सामाजिक कार्यक्रम ठरले विघ्न

दाईफ आतापर्यंत इतका अज्ञातवासात आहे की त्याची फक्त तीन छायाचित्रे उपलब्ध आहेत. एक छायाचित्र तो 20-30 वर्षांचा होता तेव्हाचा आहे, दुसऱ्या छायाचित्रात तो निकाब घातलेला आहे आणि तिसरा फोटो त्याच्या सावलीचा आहे. ज्याचा वापर ऑडिओ संदेश प्रसारित करतानाही केला जात असे.

दाईफचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही. तो गाझामध्ये तयार केलेल्या सुरुंगामध्ये राहत असल्याचे मानले जाते. इस्रायली सुरक्षा सूत्राचे म्हणणे आहे की या हल्ल्याची योजना आखण्यात आणि घडवून आणण्यात दाईफचा थेट सहभाग होता.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये इस्त्रायली हवाई हल्ल्यात रात्रभर ज्या घरांना फटका बसला, त्यापैकी एक घर दाईफच्या वडिलांचे होते आणि या हल्ल्यात दाईफचा भाऊ आणि कुटुंबातील इतर दोन सदस्य ठार झाले आहे.

विश्वास नव्हता पण नशीबच चमकलं; PSI ऑनलाईन गेम खेळला अन् दीड कोटी जिंकला

हमासच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याचा कट रचण्याचा निर्णय हमासचा नेता येह्या सिनवार यांच्यासह गाझामधील हमासच्या अल-कसाम ब्रिगेडचा कमांड असलेल्या दाईफने घेतला होता, परंतु खरा सूत्रधार कोण होता हे सर्वांना स्पष्ट झाले होते. हमासच्या काही नेत्यांनाच संपूर्ण ऑपरेशनची माहिती होती. सूत्राने स्पष्टपणे सांगितले की, “दोन डोके होते, पण मास्टरमाईंड एकच होता…”

हमासच्या सुत्राच्या मते, हा हल्ला अत्यंत गुप्ततेत करण्यात आला होता. त्याची वेळ, प्रकार किंवा इतर माहिती इराणला देखील नव्हती. इराण इस्रायलचा जाहीर शत्रू आहे आणि हमाससाठी निधी, प्रशिक्षण आणि शस्त्रांचा मुख्य स्रोत इराण आहे. तरी देखील इराणला एवढंच माहीत होतं की हमास ऑपरेशनची योजना आखत आहे.

गौतम अदानींच्या अडचणीत वाढ! दुबईतील गुंतवणुकीची सेबीकडून चौकशी

सूत्राने सांगितले की इराणला मोठ्या ऑपरेशनच्या तयारीची माहिती होती, परंतु हमास, पॅलेस्टिनी नेतृत्व, इराण समर्थित लेबनीज अतिरेकी हिजबुल्ला आणि इराण यांचा समावेश असलेल्या कोणत्याही संयुक्त ऑपरेशन रूममध्ये याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी मंगळवारी सांगितले की, इस्रायलवरील हल्ल्यात इराणचा कोणताही सहभाग नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे की इराणचा सहभाग होता, परंतु या हल्ल्यांमध्ये इराणचा थेट सहभाग असल्याचे कोणतेही गुप्तचर किंवा पुरावे नाहीत.

हमासच्या सूत्राने सांगितले की, एकीकडे इस्रायलने गाझान कामगारांना आर्थिक बक्षिसे देण्यास सुरुवात केली होती, तर दुसरीकडे हमासने इस्त्रायली सैन्यासमोर आपल्या सैनिकांना प्रशिक्षण आणि ड्रिलिंग सुरू ठेवले होते. हमासमधील परराष्ट्र संबंध विभागाचे प्रमुख अली बरका म्हणतात, “आम्ही दोन वर्षांपासून या युद्धाची तयारी केली आहे…”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube