विश्वास नव्हता पण नशीबच चमकलं; PSI ऑनलाईन गेम खेळला अन् दीड कोटी जिंकला
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा तुम्ही पैशांची फसवणूक झाल्याचं ऐकलं असेलच मात्र, एका पोलिस उपनिरीक्षकाला चक्क ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पोलिस उपनिरीक्षक ऑनलाईन गेमिंग खेळत होता, मात्र अचानक त्याला दीड कोटींचं बक्षीस मिळाल्याने त्याचा आनंद बहरुन आला आहे.
सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही ठरला
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते मागील दोन ते तीन महिन्यांपासून ऑनलाईन ड्रीम 11 गेमिंग खेळत होते. तेव्हा दोन तीन वेळा त्यांना काहीशा रक्कमेचं बक्षीस मिळालं. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी मॅच लावल्यानंतर ते मॅच जिंकले आणि तब्बल दीड कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण
माध्यमांना प्रतिक्रिया देताना सोमनाथ झेंडे म्हणाले, मला क्रिकेट खेळायला आवडत. त्यामुळे मॅच बघत असताना टीव्हीवर या गेमबद्दल समजलं. त्यानंतर मी २-3 महिन्यांपासून हा गेम खेळत आहे. मागील काही दिवसांत मी सहा ते सात मॅच खेळलो.
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; ठाकरे गट भेटीला
त्यानंतर हे बक्षीस मला मिळालं आहे, पण सुरुवातील हे मला खरं वाटत नव्हत त्यानंतर चेक करुन पाहिल्यानंतर मला विश्वास बसला की आपल्या खात्यात खरंच पैसे आले आहेत. हा गेम जोखीमेचा आहे, अर्थिक जबाबदारी सांभाळून खेळला पाहिजे, किती खेळायंच किती नाही ते आपल्यावर असल्याचं सोमनाथ झेंडे म्हणाले आहेत.
दरम्यान, देवाचे आणि आई वडिलांच्या आशिर्वादामुळेच हे बक्षीस मिळालं असून आधी विश्वासच बसला नव्हता पण नशीब चमकलंच म्हणावं लागेल, मला या गेमबद्दल काहीच माहित नाही पण पती ड्युटी सांभाळून गेम खेळत असत.
यावर माझा विश्वासच बसत नव्हता जेव्हा पैसे आले तेव्हा माझा विश्वास बसला आहे. बक्षीस मिळाल्याचा आम्हाला आनंदच झाला असल्याची प्रतिक्रिया सोमनाथ झेंडे यांच्या पत्नीने दिली आहे.