Paris Olympics : मेडल मिळण्याआधीच खेळाडूंची चांदी! सॅमसंगनं दिलं मोठं गिफ्ट

  • Written By: Published:
Paris Olympics : मेडल मिळण्याआधीच खेळाडूंची चांदी! सॅमसंगनं दिलं मोठं गिफ्ट

Paris 2024 Olympics मध्ये सहभागी झालेल्या 17000 खेळाडू आणि इतर सदस्यांना सॅमसंगने गॅलेक्सी झेड फ्लिप 6 स्पेशल ऑलम्पिक एडिशन भेट दिला आहे. हा फोन खेळाडू पोडियमवर घेऊन जाऊ शकणार आहेत. हा सॅमसंग फोन जगभरात खरेदीसाठी उपलब्ध होण्यापूर्वी खेळाडूंना देण्यात आला आहे. जाणून घेऊया याच फोनबद्दल.. (Samsung Give Special Gift To Olympic Players)

Olympics 2024 मधील यशामागे वडिलांचा मोठा त्याग; कसा आहे मनू भाकरचा प्रेरणादायी प्रवास?

स्मार्टफोन्ससह अन्य वस्तू नेण्यास होती बंदी

आतापर्यंत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना स्मार्टफोन्ससह इतर कोणतीही वस्तू पोडियमवर नेण्यास बंदीची होती परंतु सॅमसंगचा हा फोन पोडियमवर घेऊन जाता येणार आहे.

100 GB डेटा, अनलिमिटेड टेक्स्ट अन् कॉल्स

ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला मिळालेला हा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन 100GB डेटा आणि अनलिमिटेड टेक्स्ट आणि कॉल्ससह येतो. त्यामुळे खेळाडू स्पर्धा संपेपर्यंत आपल्या कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहू शकणार आहेत.

Olympics 2024 : रमिता जिंदालची दमदार कामगिरी; 20 वर्षांनी भारतीय महिला शूटरने गाठली अंतिम फेरी

फोनवर ऑलम्पिक रिंग आणि पॅरा ऑलम्पिकचं चिन्ह
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 पिवळ्या रंगात येतो ज्यावर ऑलम्पिक रिंग आणि पॅरा ऑलम्पिकचं चिन्ह आहे. शिवाय या फोनसाठी खास केसदेखील तयार करण्यात आली असून, सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 साठी कंपनीनं पॅरिसमधील मेन्स लक्जरी ब्रँडसोबत भागीदारी करत खास केसदेखील बनवली आहे. ही केस व्हेनेझिया लेदरपासून बनवण्यात आली असून यावर ऑलम्पिकच्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

AI फिचर, लाईव्ह कॉल ट्रान्सलेट अन् बरच काही

खेळाडूंना देण्यात आलेल्या फोनमध्ये गॅलेक्सी एआय फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे लाइव्ह कॉल ट्रान्सलेट करता येते. शिवाय यात टेक्स्ट कंपोज देण्यात आले असून, याच्या मदतीनं खेळाडूंना आपले विचार चांगल्याप्रकारे लिहता येणार आहेत. त्याचबरोबर यात एआय आधारित इंटरप्रेटर देण्यात आलं आहे. ज्यामुळे चालू असलेले संभाषण ट्रान्सलेट करता येते, त्यामुळे दुसऱ्या देशातून आलेल्या खेळाडूंशी खेळाडूंना संवाद साधण सोपं होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SportBuzz (@sportbuzzbr)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube