Paris Olympics : मनू-श्रीजेश ध्वजवाहक! स्टेडियमच झाले थिएटर, पाहा पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाचे फोटो

Paris Olympics 2024 Closing Ceremony: पॅरिस ऑलिम्पिकचा (Paris Olympics) समारोप समारंभ 11 ऑगस्ट रोजी झाला. हा सोहळा फ्रान्समधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर झाला.

या सोहळ्यासाठी स्टेडियमचे थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आले. स्टेडियमचा नजारा पाहण्यासारखा होता.

या सोहळ्यात एक परेडही झाली, ज्यामध्ये सर्व खेळाडू आपापल्या देशांचे झेंडे घेऊन दिसले.

भारतीय नेमबाज मनू भाकर आणि हॉकीपटू पीआर श्रीजेश स्टेड डी फ्रान्सच्या बाहेर समारोप समारंभाच्या आधी तिरंगा घेऊन जाताना दिसले.

मनू भाकर आणि पीआर श्रीजेश यांना पाहून तमाम भारतीयांना आनंद झाला.

ऑलिम्पिक मशाल बलूनद्वारे पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर पोहोचली. यासह समारोप समारंभास सुरुवात झाली.

स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर मोठ्या सुवर्णपदकाचे प्रदर्शन करण्यात आले. यानंतर सर्व देशांचे ध्वजधारक येऊ लागले.

समारोप समारंभात गोल्डन व्हॉयेजरचे कलाकार ग्रीसचा ध्वज हातात धरून परफॉर्म करताना दिसले.

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ हवेत स्टंट करत स्टेडियममध्ये पोहोचला

ऑस्कर पुरस्कार विजेती गॅब्रिएला सार्मिएन्टो विल्सन यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले
