मराठमोळा ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 11 लाखांचे बक्षीस

  • Written By: Published:
मराठमोळा ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 11 लाखांचे बक्षीस

Puneet Balan Group : पुनीत बालन ग्रुपकडून पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) दमदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकणारा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे 11 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) यांना हा बक्षिसाचा धनादेश पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan Group) यांच्या हस्ते देण्यात आला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत स्वप्निल कुसळे यांनी कांस्यपदक जिंकले होते. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. स्वप्निल कुसळे यांच्या कामगिरीची दखल घेत युवा उद्योजक पुनीत बालन यांनी 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सोमवारी (09 सप्टेंबर) हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या आरतीचा मान ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे यांना देण्यात आला तसेच 11 लाख रुपयांचा बक्षिसाचा धनादेश देखील पुनीत बालन यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना स्वप्निल कुसळे यांनी पुनीत बालन ग्रुपचे आभार मानले. मी गणपती बाप्पाचा भक्त आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी असल्याने मला कांस्य पदक मिळाले असं स्वप्निल कुसळे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करण्याचा मान मला मिळाला हे माझे भाग्य समजतो. पुनीत बालन ग्रुपकडून यापूर्वी देखील अनेक गुणी आणि होतकरु खेळाडूंना आर्थिक मदत देऊन त्यांच्या पुढील प्रवासात खारीचा वाटा उचलला आहे. सध्या त्यांच्या या कार्याचा समाजाच्या सर्वच स्तरातून गौरव करण्यात येत आहे.

… म्हणून बापू पठारे सोडणार भाजपची साथ, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा

यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकून स्वप्निलने केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं नाव जगात उज्ज्वल केले आहे. स्वप्निल सारख्या अनेक प्रतिभावान खेळाडू घडण्याची गरज आहे. त्यादृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुनीत बालन ग्रुप अशा खेळांडूंच्या कायम पाठिशी राहिला आहे आणि राहील देखील. तसेच भविष्यात स्वप्निल निश्चितच भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube