Asian Champions Trophy 2024: चीनचा धुव्वा उडविला; भारत पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन

  • Written By: Published:
Asian Champions Trophy 2024: चीनचा धुव्वा उडविला; भारत पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन

India beats China to retain Asian Champions Trophy Title: आशियाई चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) भारतीय संघाने (India) इतिहास रचलाय. चीनमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने चीनला 1-0 ने धूळ चारली. सामन्याच्या 52 व्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल डागत विजयी गोल केला. प्रत्युत्तरात चीनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय खेळाडूंनी ते यशस्वी होऊ दिले नाही. लीगच्या पहिल्याच सामन्यात भारताने चीनचा 3-0 असा पराभव केला होता.

IND vs PAK Hockey: ‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा 2-1 धुव्वा 

सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. परंतु चीनच्या गोलकीपरने चपळाई दाखवत गोल होऊ दिले नाहीत. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने तीन गोल डागण्याचे प्रयत्न केले. पण 52 व्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल केला. हाच गोल विजयासाठी निर्णायक ठरला.

भारताने सगळे सामने जिंकले

भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्वच सामने सहजपणे जिंकले आहेत. साखळीतील पहिल्या सामन्यात चीनचा 3-0 ने धुव्वा उडविला होता. तर जपानला 5-1, मलेशियाला 8-1 ने पराभूत केले. दक्षिण कोरियाला 3-1, पाकिस्तानला 2-1 ने पराभूत केले. तर सेमिफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभूत करत भारताने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला होता.


तीन पराभवानंतर चीन फायनलमध्ये

साखळी सामन्यात चीनचे तीन पराभव झाले होते. तर दोन सामने जिंकले होते. चीनला भारत, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तानने हरविले होते. तर मलेशिया आणि जपानला पराभूत करत चीन सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर चीनने शूटआऊटमध्ये पाकचा 2-0 ने पराभव करत फायनल गाठली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube