मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! जीएसटी कपातीमुळे अनेक वस्तू होणार स्वस्त, संपूर्ण यादी समोर…

मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! जीएसटी कपातीमुळे अनेक वस्तू होणार स्वस्त, संपूर्ण यादी समोर…

GST Reduction PM Modi Decision : जीएसटी काउन्सिलने (GST Reduction) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीत महत्त्वाचे (PM Modi Decision) करसंबंधी निर्णय घेण्यात आले. यावेळी विद्यमान चार टप्प्यांऐवजी (5%, 12%, 18% आणि 28%) कर रचनेत मोठा बदल करून फक्त दोन मुख्य स्लॅब ठेवण्यात आले आहेत. 5 टक्के आणि 18 टक्के. यामुळे अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

12% आणि 28% स्लॅब रद्द

बैठकीत 12% आणि 28% हे स्लॅब रद्द करण्यात आले. त्यामुळे आधी 28% कर असलेल्या वस्तूंवर आता केवळ 18% जीएसटी आकारला जाईल. दुसरीकडे, लक्झरी तसेच आरोग्यास हानीकारक वस्तूंसाठी स्वतंत्र 40% करदर निश्चित करण्यात आला आहे. निर्मला सितारमण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कररचनेबाबत दिलेला संकेत आम्ही प्रत्यक्षात आणला आहे. सर्व राज्यांच्या सहमतीने हा निर्णय एकमताने घेण्यात आला. नव्या करप्रणालीची अंमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे.

कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

शून्य करदर : युएचटी दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी आणि पराठा यांसारख्या वस्तूंना कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही.

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

5% जीएसटी :

– सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता, खजूर इ.)
– नारळ पाणी, सोया मिल्क ड्रिंक, फळांच्या रसावर आधारित पेय
– पॅकेज्ड पास्ता, नूडल्स, कॉर्नफ्लेक्स, फ्रूटेड राईस
– बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन, भुजिया इ.
– चष्मे व दृष्टीसंबंधी उपकरणे
– शेतकऱ्यांची उत्पादने, संगमरवरी व चामडे यांवरील कर कमी करून 12% वरून 5% करण्यात आला आहे.
– आरोग्य क्षेत्र : 33 औषधांवर तसेच अनेक आरोग्य उपकरणांवर जीएसटी रद्द.
– विमा क्षेत्र : आरोग्य विमा व जीवन विमा पॉलिसींवरील करात सवलत.
– कपडे व शूज : 12% ऐवजी आता फक्त 5% कर.
– घरगुती उपकरणे : एसी, वॉशिंग मशीन, 38 इंचांपेक्षा मोठे टीव्ही, लहान कार यांवरील कर 28% वरून घटून 18% झाला आहे.

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

कोणत्या वस्तू महाग होणार?

  • लक्झरी कार आणि उच्च क्षमतेच्या बाईक : 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक आणि लक्झरी कार आता महाग होणार.
  • तंबाखूजन्य पदार्थ : पान मसाला, सिगारेट, गुटखा, जर्दा, विडी तसेच फ्लेवर्ड कार्बोनेटेड पेये यांना 40% विशेष करदर लागू होणार.

या निर्णयामुळे सर्वसामान्य घरगुती वस्तूंवरचा करभार कमी झाला असला तरी लक्झरी उत्पादने व आरोग्याला अपायकारक पदार्थ अधिक महागणार आहेत. ग्राहकांच्या खिशाला दिलासा देणारा आणि कररचना सुलभ करणारा हा बदल ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube