GST Council Meeting: कपडे, शूज आणि कार होणार स्वस्त? आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

Today GST Council Meeting Decision : आज जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक (GST Council Meeting) होणार आहे. या बैठकीत कर रचनेत बदल करण्याचा निर्णय होऊ शकतो. यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त (GST) होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी प्रणालीत व्यापक सुधारणा होणार असल्याचे संकेत दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक निर्णायक मानली जात आहे.
दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी कमी होणार
या बैठकीत तूप, बटर, टूथपेस्ट, शॅम्पू, चीज, दूध पावडर, सिमेंट आणि कार यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी होऊ शकतात. दरकपातीमुळे ग्राहकांना थेट फायदा होणार असून लहान व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळेल.
12% आणि 28% स्लॅब होणार रद्द
सध्या जीएसटीमध्ये 5%, 12%, 18% आणि 28% असे चार करस्लॅब आहेत. परंतु आजच्या बैठकीत 12% आणि 28% स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18% स्लॅब ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या 250 हून अधिक वस्तूंवर 12% कर आकारला जातो. त्यापैकी 223 वस्तू 5% मध्ये आणि उर्वरित 18% स्लॅबमध्ये हलवण्याची शक्यता आहे. 30 हून अधिक वस्तूंवर 28% कर लागू आहे. त्या वस्तू 18% करस्लॅबमध्ये येऊ शकतात. यामध्ये वाहनांचे पार्ट्स, एसी, टीव्ही आणि मोटारसायकल यांचा समावेश आहे.
कपडे आणि सिमेंट स्वस्त होणार
कपड्यांवर जीएसटीचा दर 5% ठेवण्याचा विचार सुरू आहे. तसेच सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी होऊ शकतो. यामुळे बांधकाम क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल.
मोठी बातमी! भारताची समुद्री ताकद वाढणार, नौदलाला मिळणार 9 नव्या पाणबुड्या
विम्यावरील कर रद्द होण्याची शक्यता
टर्म इन्श्युरन्स आणि आरोग्य विम्यावर लागू असलेला जीएसटीही रद्द करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. यामुळे सर्वसामान्यांना विमा पॉलिसी घेणे सोपे होईल.
कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा
सध्या कारवर 28% जीएसटी आणि त्यासोबत 22% उपकर आकारला जातो, म्हणजेच एकूण 50% कर ग्राहकाला भरावा लागतो. जर जीएसटी दर 18% पर्यंत कमी झाला, तर एकूण करस्लॅब 40% होईल. त्यामुळे कारच्या किंमती लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.