मोठी बातमी! भारताची समुद्री ताकद वाढणार, नौदलाला मिळणार 9 नव्या पाणबुड्या

Indian Navy Will Get 9 Submarine : भारत आपली संरक्षण क्षमता सातत्याने वाढवत आहे. आता भारतीय नौदलाला (Indian Navy) नव्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा (Submarine) मोठा पुरवठा होणार आहे. लवकरच 9 अत्याधुनिक पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात सामील होणार असून त्यांचे बांधकाम मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी (75i Enhance Strength) किंमत चर्चेचा टप्पा सुरू असून, त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) कडून अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे.
प्रोजेक्ट-75 चा पुढील टप्पा
भारताने 2005 मध्ये फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपसोबत प्रोजेक्ट-75 अंतर्गत 6 स्कॉर्पीन क्लास पाणबुड्यांचा करार केला होता. आजवर कलवरी, खंडेरी, करंज, वेला, वगीर आणि वगशीर या सहा पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या आहेत. या पाणबुड्यांना जगातील सर्वात अत्याधुनिक अटॅक सबमरीन मानलं जातं. त्या टॉरपीडो आणि अँटी-शिप मिसाईल्सद्वारे गुप्त हल्ला करण्यास सक्षम आहेत.
करिअर, प्रेम आणि आरोग्याबाबत कसे आहे ग्रहमान? आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य, जाणून घ्या…
याच प्रकल्पाच्या फॉलो-ऑन ऑर्डरमध्ये आणखी 3 पाणबुड्या नौदलात येणार आहेत. त्याशिवाय प्रोजेक्ट-75 इंडिया अंतर्गत 6 नव्या पाणबुड्यांच्या करारावरही काम सुरू आहे. अशाप्रकारे येत्या काही वर्षांत नौदलाला एकूण 9 नवी पाणबुड्या मिळणार आहेत.
अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचीही तयारी
सध्या भारताकडे 17 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आणि 2 न्यूक्लियर बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या (SSBN) आहेत. याशिवाय सरकारने 2 न्यूक्लियर अटॅक सबमरीन (SSN) निर्मितीसही मंजुरी दिली आहे. अपेक्षा आहे की पहिली स्वदेशी SSN पाणबुडी 2036-37 पर्यंत नौदलात दाखल होईल.
हैदराबाद गॅझेटची आमची कायम तयारी होती; पण.., आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पाकिस्तानची तयारी कुठपर्यंत?
दुसरीकडे पाकिस्तान नौदल सामर्थ्य वाढवण्यासाठी चीनकडून 8 युआन क्लास एअर इंडिपेंडेंट पाणबुड्या खरेदी करत आहे. त्यापैकी 3 पाणबुड्या त्यांना मिळाल्या आहेत. मात्र तज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या हंगोर क्लास सबमरीन भारतीय स्कॉर्पीन पाणबुड्यांच्या तुलनेत खूपच मागे आहेत.
त्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळतात :
– प्रपल्शन सिस्टम आणि सेन्सर्स जुने आहेत.
– आकार मोठा असल्याने मॅन्युव्हरिंग कमी प्रभावी.
– जर्मनीच्या MTU इंजिनवर बंदी आल्याने चीनला CHD-620 इंजिन बसवावे लागले.
– चीनी पाणबुड्या जास्त आवाज करतात, त्यामुळे त्यांना शोधणे सोपे जाते.
– चीनचा एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) सिस्टमही अविश्वसनीय मानला जातो.
भारताने सुरू केलेल्या या नव्या प्रकल्पामुळे भारतीय नौदलाची ताकद आगामी काळात अनेक पटींनी वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या पाणबुड्या हिंद महासागरात भारताचा दबदबा अधिक ठळक करण्यास मदत करतील.