Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या आधीच भारताने केली क्षेपणास्त्र चाचणी…

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 28 भारतीयांचा नाहक बळी गेला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. पाकिस्तानविरोधात भारताने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडूनही जोरदार हालचाली सुरु असल्याचं समजंतय. अशातच आता भारतानेही एक पाऊल पुढे टाकत क्षेपणास्त्राची चाचणी केलीयं. भारतीय नौदलाच्या आयएनएस सुरतने अरबी समुद्रातून लक्ष्य गाठले. भारतीय नौदलाने हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागले. भारतीय नौदलाचे स्वदेशी क्षेपणास्त्र नाशक आयएनएस सुरतने समुद्रात लक्ष्य गाठलंय.
राज्यातील पर्यटकांना घेऊन निघालेले दुसरे विमान जम्मू आणि काश्मीरमधून मुंबईकडे रवाना
एका पोस्टमध्ये ही माहिती देताना भारतीय नौदलाने म्हटले आहे की, ‘संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी हे आणखी एक मैलाचा दगड ठरले. स्वावलंबी भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचण्या करण्याच्या घाईत भारताने ही कारवाई केली. पाकिस्तान क्षेपणास्त्राची चाचणी करू शकते अशा बातम्या आल्या होत्या. याआधीच भारताने एक कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
रायफल हिसकावण्याचा प्रयत्न अन्…, सय्यद हुसेन शाह पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी भिडला
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाजवळ 500 हून अधिक लोकांनी निदर्शने केली. आंदोलकांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी केली आणि हातात फलक घेऊन त्यांनी पाकिस्तानविरोधात ठोस कारवाईची मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानवर भारतातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. पहलगाम हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पाकिस्तानचाही उल्लेख केला जात आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुमारे 1500 लोकांना ताब्यात घेतले आहे असून त्यांची चौकशी सुरु आहे.
भारत पाकिस्तानचे पाणी तोडू शकतो का?; किती ताकद अन् अधिकार.. जाणून घ्या, पाणीवाटपाचा इतिहास
दरम्यान, लष्करप्रमुखांचा खोऱ्यातील दौरा देखील प्रस्तावित आहे. श्रीनगरमध्ये बैठकांची मालिका सुरू आहे. भारतीय तपास संस्था इमिग्रेशन विभागाकडून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेत असून त्यांची चौकशी करत आहेत.