रायफल हिसकावण्याचा प्रयत्न अन्…, सय्यद हुसेन शाह पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी भिडला

रायफल हिसकावण्याचा प्रयत्न अन्…, सय्यद हुसेन शाह पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी भिडला

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक पर्यटक जखमी देखील झाले आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या 27 पर्यटकांमध्ये  सहा महाराष्ट्रामधील पर्यटकांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून देण्यात आली आहे.

या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओंवर लोकांचे वेगवेळ्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर टार्गेट केला असा दावा देखील या व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेनुसार, दहशतवाद्यांनी फक्त धर्म विचारुन त्यांच्या पतीची हत्या केली. यानंतर सोशल मीडियावर हिंदू – मुस्लिम होताना दिसत आहे. माहितीनुसार या हल्ल्याची लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना टीआरएफने जबाबदारी स्वीकारली आहे.

तर दुसरीकडे आता सोशल मीडियावर या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या  एका मुस्लिम तरुणाची स्टोरी व्हायरल होत आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक घोडेस्वार सय्यद हुसेन शाहला (Syed Hussain Shah) जीव गमवावा लागला आहे. पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद आदिल हुसेन शाहला जीव गमवावा लागला आहे. तो दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती समोर आली आहे. त्याने निर्दोष पर्यटकांना मारु नये अशी विनंती दहशतवाद्यांना केली तसेत पर्यटक काश्मिरी लोकांचे पाहुणे आहे त्यांना मारु नका असं देखील तो म्हणत होता.

माहितीनुसार, सय्यद आदिल हुसेन शाह घोडेस्वार होता आणि तो त्याच्या कुटुंबात एकमेव कमावणारा होता. सय्यद आदिल हुसेन शाह याच्या मृत्यूनंतर माध्यमांशी बोलताना त्याची आई अश्रूंनी भरली. सय्यद आदिल हुसेन शाहच्या आईने सांगितले की, आदिल कुटुंबातील एकमेव कमावणारा पुरुष होता. तो आमचा एकमेव आधार होता. तो घोडेस्वारी करून कुटुंबाचा खर्च चालवत होता. आता आम्हाला दुसरा कोणी नाही. असं रडक्या आवाजात आदिलच्या आईने माध्यमांना सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप

रायफल हिसकावण्याचा प्रयत्न

दैनिक जागरणने काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, सय्यद आदिल हुसेन शाह पर्यटकांना फिरायला घेऊन घोड्यावरून बैसरनला गेला होता मात्र जेव्हा हल्ल्या सुरु झाला तेव्हा त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हे काश्मीरचे पाहुणे आहेत. निर्दोष आहे. त्यांना मारू नका.अशी विनंती आदिल दहशतवाद्यांना करत होता. त्यानंतर त्यांने दहशतवाद्यांची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube