पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप

Pakistan Reaction On Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर आता पाकिस्तानची (Pakistan Defence Minister) प्रतिक्रिया समोर आली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नाकारतो. एका पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिनीला निवेदन देताना ख्वाजा आसिफ यांनी भारतावर आरोप (Khwaja Asif On Pahalgam Terrorist Attack) केले. त्यांनी म्हटलंय की, या हल्ल्यामागे भारतातील लोक आहेत. ते पुढे म्हणाले की भारतात नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत जनता सरकारच्या विरोधात आहेत.

Video : पहलगाम हल्ल्यातील मृतांना ५ लाखांची मदत; सर्वांना सुखरूप घरी पोहचवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

भारत सरकार नागरिकांच्या हक्कांची हत्या करत आहे. ती त्यांचे शोषण करत आहे. म्हणूनच लोक त्याच्या विरोधात उभे आहेत. भारतीय सरकार अल्पसंख्याकांना त्रास देत आहे, असं पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी म्हटले आहे की, पहलगाममध्ये घडलेल्या अशा घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. मी अशा हल्ल्यांचा निषेध करतो. विशेषतः नागरिकांवर असे हल्ले होऊ नयेत.

गृहमंत्री अमित शाहंकडून नागरिकांना धीर; रस्त्यांवर शांतता, कशी आहे पहलगामध्ये हल्ल्यानंतरची परिस्थिती?

संरक्षण मंत्री ख्वाजा पुढे म्हणाले की, भारताचे सध्याचे सरकार तेथे राहणाऱ्या अल्पसंख्याकांना त्रास देत आहे. यामध्ये बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा समावेश आहे. लोकांची कत्तल केली जात आहे. लोक याविरुद्ध आवाज उठवत आहेत. आम्ही दहशतवादाला अजिबात पाठिंबा देत नाही. याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार आहे. हिंदुत्वावादी हुकुमशाहीविरूद्ध हे पाऊल अल्पसंख्यांक गटाकडून उचललं गेलंय, असं त्यांनी म्हटलंय.

या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी त्यांनी काश्मीरला त्यांच्या देशाची जीवनरेखा असल्याचे वर्णन केले होते. 16 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये प्रवासी पाकिस्तानींच्या परिषदेला संबोधित करताना असीम मुनीर म्हणाले होते की, ही आमची नस होती आणि राहील. आम्ही हे विसरणार नाही. भारतीय कब्जाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना एकटे सोडणार नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube