श्रीनगरमधील एक पोस्टर अन् NCR वर हल्ल्याचं प्लॅनिंग; पोलिसांना Sleeper Cell कसे सापडले?
faridabad explosive update डॉक्टर आदिलने चौकशीत नेटवर्क हाशिमच्या नेतृत्त्वाखाली सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
How A Poster In Srinagar Led Police To Sleeper Cell Planning Attack On NCR : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र, दिल्लीत घडलेल्या भीषण स्फोटपूर्वी पोलिसांनी श्रीनगरमध्ये लावलेल्या एका पोस्टरच्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमध्ये घडवण्यात येणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा कट उधळवून लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांनी अतिरेकी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या या मॉड्यूलमध्ये स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरापर्यंत एका पोस्टरच्या माध्यमातून पोलीस कसे पोहोचले त्याबद्दल जाणून घेऊया…
मोठी बातमी! दिल्लीत स्फोट झालेल्या कारचा मालक कोण?, नाव आलं समोर
श्रीनगरच्या नौगाम भागात लावले होते पोस्टर
दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या फरिदाबादमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्यानंतर विविध ठिकाणी काम करणाऱ्या काही डॉक्टरांचे दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीनगरच्या नौगाम भागात एक पोस्टर दिसून आल्यानंतर हे धक्कादायक वास्तव्य उघडकीस आले आहे.
पोस्टरवर काय लिहिलेले होते?
श्रीनगरच्या नौगाम भागात लावण्यात आलेल्या पोस्टरवर येथील दुकानदारांनी केंद्रीय संस्थांशी संपर्क साधू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. हे पोस्टर कुणी लावले याचा शोध घेत असताना सीसीटीव्हीमध्ये पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर आला. ही व्यक्ती सहारनपूरमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत सखोल चौकशी केली असता पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीची ओळख काश्मिरी वंशाचे डॉ. आदिल असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान डॉ. आदिलने श्रीनगरमधील इतर तीन डॉक्टरांशी त्याचे संबंध असल्याची कबुली दिली.
2021-22 मध्ये स्लीपर सेल मॉड्यूल झाले स्थापन
आदिलच्या मुसक्या आवळल्यानंतर तपासावेळी हे नेटवर्क सुरूवातीला 2021-22 मध्ये हाशिम या व्यक्तीच्या नेतृत्त्वाखाली सुरू करण्यात आले होते. त्यानंतर खोऱ्यातील डॉक्टर उमरच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा पुनर्गठित करण्यात आल्याचे डॉक्टर आदिलने चौकशीत सांगितले. चौकशीत आदिलने डॉ. मुझम्मिलसह अन्य डॉक्टरांची नावे उघड केली. त्यानंतर फरीदाबादमध्ये डॉ. मुझम्मिलच्या क्लिनिकमधील कारवाईवेळी मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली.
हळूहळू कार चालली अन् स्फोट झाला; दिल्लीतील स्फोट म्हणजे सुसाईड बॉम्बरच ?
डॉ. आदिल अहमद राठर
अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी आहे.
महिला डॉक्टर
दुसरी अटक 7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाली. अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. तिचा या नेटवर्कमध्ये काय रोल आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.
तिसऱ्या डॉक्टरचं शिक्षण चीनमध्ये
7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं. हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे. चीनमध्ये त्याने शिक्षण घेतलय. चौकशीत समोर आलय की, रिसिन नावाचं एक खतरनाक विष तो बनवत होता. त्याने दिल्ली आजादपुर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालय सारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.
चौथ्या डॉक्टरकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट
या ऑपरेशनमध्ये चौथी अटक 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून झाली. डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला, तिथून 2563 किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.
देशात घडवून आणायचा होता मोठा हल्ला
फरीदाबादमध्ये डॉ. मुझम्मिलच्या क्लिनिकमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी अमोनियम नायट्रेट आणि इतर रसायनांसह आयईडी बनवण्याच्या साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या टोळीचे ध्येय IED म्हणजेच इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस तयार करणे आणि देशभरात दहशतवादी हल्ले करणे होता. एवढेच नव्हे तर, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांशी संलग्न असलेली स्वतःची दहशतवादी संघटना स्थापन करण्याचाही या डॉक्टरांचा हेतू असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी
परदेशात बसलेल्या हँडलर्सकडून मिळत होत्या सूचना
अटक केलेल्या आरोपींना परदेशात बसलेल्या हँडलर्सकडून सूचना दिल्या जात होत्या आणि बाहेरून पैसेही पुरवले जात होते, असे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर, शस्त्रांसाठी पाकिस्तानी आणि परदेशी हँडलर पैसे पुरवत होते असेही समोर आले आहे. चौकशीदरम्यान, लिग्राम आणि इतर गेमिंग अॅप्लिकेशन्स आणि चॅट अॅप्लिकेशन्सचा वापर आपापसात संवाद साधण्यासाठी केला जात होता. परदेशातील येणाारा निधी गोळा करून धार्मिक उपक्रमांच्या नावाखाली मदरशांमध्ये तरुणांना संघटनेसाठी भरती करण्याचा कटही रचला जात होता. जमा होणाऱ्या निधीच्या पैशातून स्थानिक पातळीवर शस्त्रेदेखील खरेदी केली जात होती.
सुरक्षा पथकांनी फरीदाबादच्या बाहेरील धौज गावात केलेल्या धडक मोहिमेत अल-फलाह विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका खाजगी वैद्यकीय संस्थेचीही तपासणी करण्यात आली. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे महाविद्यालय आखाती देशांकडून मिळालेल्या परदेशी निधीतून स्थापन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एका एका देणगीदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या स्मरणार्थ याची निर्मिती करण्यात आली होती.
उच्च गुप्तचर सूत्रांनी या मॉड्यूलचे वर्णन संभाव्य स्लीपर-सेल अशी केली असून, या गटाला दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा दहशवादी हल्ला घडवून आणायचा दाव होता. एवढेच नव्हे तर, नौगाम भागात लावण्यात आलेलं पोस्टरने जरी हा सर्व कट उघडकीस आणला असला तरी, या दहशवादी संघटनेची व्याप्ती व्यापक असून, फरीदाबादमधील स्फोटके आणि इतर स्फोटकांवरून देशभरात स्लीपर सेलच्या माध्यमातून ही संघटना व्यापलेली असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यादृष्टीनेही तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.
