Pahalgam Terrorists Attack : हिंदू अन् मुस्लिम वेगळे..,; पाकिस्तानी आर्मी चीफच्या भाषणाने ठिणगी? काश्मीरात नरसंहार

Pahalgam Terrorists Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून (Pahalgam Terrorists Attack) पर्यटकांना टार्गेट करुन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना द रजिस्टेंट फ्रंटने स्विकारली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान सेनेचे प्रमुख जनरल जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय. पाकिस्तानच्या सेना प्रमुखांनी हिंदुंबाबत विधान केलं होतं, त्यानंतरच हा नरसंहार घडलायं.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याआधी हिंदुंबाबत एक विधान केल. हिंदू आणि मुस्लिम दोघेही वेगळे असून एकत्र राहू शकत नाहीत, यावर बोलण्यावर मुनीर यांनी भर दिला होता. मुनीर यांनी बोलताना मुस्लिमांना हिंदुंपेक्षा वेगळे असल्याचं वर्णन केलं होतं, असा रिपोर्ट टाईम्स ऑफ इंडियाने दिला होता.
Video: तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो… मंजुनाथ यांच्या पत्नीला दहशतवादी काय म्हटले ?
जनरल असीम मुनीर यांच्या भाषणानंतरच पहलगाम हल्ल्याची योजना आखण्यास प्रोत्साहन मिळालं असावं. या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांची नावे आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्याने हा हल्ला असीम मुनीर यांच्या भाषणाकडेच बोट दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय.
या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह कुसरी उर्फ खालिद असल्याचं सांगितलं जातंय. रावलकोटमध्ये दोन लष्कर कमांडरची भूमिका तपासली जात असून एक म्हणजे अबू मुसा. 18 एप्रिलला मुसाने रावलकोटमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा त्याने म्हटले, काश्मीरमध्ये जिहाद सुरुच राहील, बंदुका चालवल्या जातील, शिरच्छेदन सुरुच राहील. स्थानिक नसलेल्यांना निवास प्रमाणपत्र देऊन भारत काश्मीरची डेमोग्राफी बदलू इच्छित असल्याचं मुसाने म्हटलं.
काय म्हणाले पाकिस्तानी आर्मी चीफ?
आपल्या पूर्वजांना आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे असून आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती, परंपरा, विचार आणि महत्त्वाकांक्षाही वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथेच द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया रचला गेला. आपण आता दोन राष्ट्रे आहोत, एक राष्ट्र नाही. आपल्या पूर्वजांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला. त्यामुळे आपल्याला देशाचं रक्षण कसं करायचं याची माहिती असल्याचाही दावाही असीम मुनीर यांनी केला.
जनाधार असलेल्या नेत्यांची कॉंग्रेसला अॅलर्जी; थोपटेंच्या पक्षांतरावरून सत्यजित तांबेंनी सुनावले
गुप्तचर संस्थांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हल्लेखोर हल्ल्याच्या काही दिवस आधी आले होते, त्यांनी शोधमोहीम केली आणि नंतर संधी मिळताच हल्ला केला. एप्रिलच्या सुरुवातीला (१-७), दहशतवाद्यांनी काही हॉटेल्सची हेरगिरी केल्याचीही माहिती असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असून या हल्य्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 20 जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे. या हल्ल्यामध्ये अनेक थरारक हत्या झाल्याचं समोर आलं आहे. एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.