ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी…, पृथ्वीराज चव्हाण यांना आली मोठी शंका
काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो याला विरोध करत आहे, असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे सगळे खोटे आकडे देण्यात आले आहेत, देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे. विकसित देशाची व्याख्या काय आहे ? हे पंतप्रधान मोदी यांनी सांगावं? असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
पुढं बोलताना चव्हाण म्हणाले, सगळे बोगस आणि खोटे आकडे आहेत, शेती विस्कळीत झाली आहे. ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दबावाखाली काम करत आहेत, काल अमेरेकेने भारताच्या जहजावर हल्ला केला आणि त्यात 3 जण मारले गेले. आपण विचारलं पण नाही, पाऊस पडला नाही तर गंभीर स्थिती निर्माण होईल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जात आहे. काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो याला विरोध करत आहे, असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोटभर भोजन, डोक्यावर छत सर्वांना मिळावी ही अपेक्षा आहे. मात्र सध्या मूठभर लोकांनाच फायदा मिळत आहे. आपल्याला आता दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामसाठी लढाईची तयारी करावी लागेल, काही चुकीचं दिसत असेल तर आंदोलन करण्यात आपण कमी पडत आहोत. एपस्टीन फाईल्समध्ये काय आहे ? त्याची माहिती असणारा एकच माणूस आहेत ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. संपूर्ण में महिना मी रस्स्त्यावर होतो. मोर्चे आंदोलन असे अनेक कार्यक्रमात सहभागी झालो.
500 रुपयांची नोट गायब झालेली आहे. चलन तुटवडा झालेला आहे, पैसे चलनामध्ये उपलब्ध नाही, असमतोल निर्माण झाला आहे, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यशवंत सिन्हा यांनी देखील भाजपवर हल्लाबोल करत आता काँग्रेसवर मोठी जबाबदारी आली असल्याचं म्हटलं आहे. देशाला या संकटातून काँग्रेसने वाचवायला पाहिजे. त्यासाठी एकमात्र रस्ता म्हणजे आता रस्त्यावर उतरायला हवे. लाठी काठी खाण्याची आणि जेलमध्ये जाण्याची तयारी देखील त्यासाठी ठेवावी. वर्तमान सरकार देशाला या संकटातून बाहेर काढू शकत नाही, त्यासाठी मोदी मस्ट गो, जेवढं लवकर शक्य आहे, तेवढं, असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.