Prithviraj Chavan यांना मुख्यमंत्री असताना राज्यात काय चाललंय कळालं नाही; खासदार विखेंची बोचरी टीका
Ahmednagar : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यातच सत्ताधारी गटात असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar)यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil)यांनी निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय हेच कळलं नाही तर त्यांना या गुप्तबैठकीची माहिती असावी हा एक मोठा विनोदच आहे, अशी बोचरी टीका यावेळी खासदार विखे यांनी केली.
CM Eknath shinde आजारी असल्याचे सांगून अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपचा डाव
हर घर तिरंगा या उपक्रमासाठी आज नगर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर, महेंद्र गंधे, बाबासाहेब वाकळे, अरुण मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोठी बातमी ! ठाण्यातील पालिका रुग्णालयात आणखी चौघांचा मृत्यू
दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना विखे यांनी राजकीय मुद्द्यावर भाष्य केले. अजित पवार व शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान शरद पवार यांना मोठी ऑफर देखील देण्यात आली होती, असे विधान चव्हाण यांनी केले होते. यावर बोलताना विखे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय हेच कळलं नाही तर त्यांना या गुप्तबैठकीची माहिती असावी हा एक मोठा विनोदच आहे. त्यामुळे त्यांनी जेवढे महाराष्ट्र्राचे कल्याण करायचे तेवढे पुरे झाले, आता उगाच माध्यमांची प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका टिपण्णी करू नये असा सल्ला यावेळी विखे यांनी चव्हाण यांना दिला.
काका- पुतण्यात झाली गुप्त बैठक
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोन गट पक्षात निर्माण झाले. अजित दादांचा एक गट व शरद पवार यांचा एक गट
निर्माण झाला. दरम्यान नुकतेच अजित पवार आणि शरद पवार यांची एक गुप्त बैठक झाल्याचे समोर आले होते. याबैठकीनंतर शरद पवार अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा रंगली होती. यावर पवारांनी आपला नकार स्पष्ट केला आहे.
मात्र याच भेटीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे भाष्य केले. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.