Indian Navy : ‘राजमुद्रे’चाच आधार! नौदलातील अधिकाऱ्यांच्या बॅजमध्ये मोठा बदल

Indian Navy : ‘राजमुद्रे’चाच आधार! नौदलातील अधिकाऱ्यांच्या बॅजमध्ये मोठा बदल

Indian Navy : भारतीय नौदलाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी (Indian Navy) एक बॅज सादर केले आहे. अधिकाऱ्यांच्या गणवेशावर लावण्यात येईल. बॅज म्हणजे अधिकाऱ्यांनी परिधान केलेल्या वर्दीवरील खांद्याच्या बाजूने लावलेले खास प्रकारचे चिन्ह आहे. यासाठी नौदलाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेलाच आधार मानलं आहे. त्यानुसारच डिझाईन तयार करून हे नवीन बॅज लाँच करण्यात आले आहे. आता नौदलाचे अधिकारी त्यांच्या गणवेशावर परिधान करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सिंधुदुर्ग येथे 4 डिसेंबर रोजी नौदल दिनी बॅजसाठी नवीन डिझाईन तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती. अॅडमिरल, व्हाईस अॅडमिरल आणि रिअर अॅडमिरल या पदांसाठी नव्याने डिझाईन केलेले एपोलेट्स जारी करण्यात आले. भारतीय नौदलातील ही तीन सर्वोच्च पदे आहेत. पीएम मोदींनी आधीच सांगितले होते की गुलामगिरीची मानसिकता पुढील काळात राहणार नाही. त्याच दिशेने सरकारकडून सातत्याने पावले टाकली जात आहेत.

भारतीय जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; संरक्षणमंत्र्यांचा इशारा

नौदलाने या अॅडमिरल बॅजचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये रिअर अॅडमिरल, सर्जन रिअर अॅडमिरल, सर्जन व्हाइस अॅडमिरल आणि अॅडमिरल या पदांसाठीचे एपोलेट्स म्हणजेच खांद्यावरील बॅजमध्ये बदल केले आहेत. याबाबत भारतीय नौदलाने खास माहितीही दिली आहे. या नव्या बॅजचे खास वैशिष्ट्यही नौदलाने सांगितले आहे.

नव्या बॅजची वैशिष्ट्येही खास 

  • या नव्या बॅजमध्ये ज्या चिन्हांचा वापर करण्यात आल आहे. त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये ऑक्टोगन बटण आठ दिशा दर्शवते. या द्वारे नौदलाचा दीर्घकालीन दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो.
  • भारतीय तलवारीचे चिन्ह देशाला ताकदीत आघाडीवर ठेवण्यावर भर देते. तसेच प्रभावाच्या जोरावर युद्ध जिंकणे, शत्रूचा पराभव करणे आणि मार्गात येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देण्याच्या नौदलाच्या उद्दीष्टांवरही जोर देते.
  • दुर्बिणीचे चिन्ह जगात दीर्घकालीक दृष्टी, दूरदर्शिता आणि हवामानावर नजर ठेवणे या गोष्टींचे प्रतीक आहे.
  • नेवी बटण चिन्ह गुलामीची मानसिकता संपवण्याचे सांगते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube