अमेरिकेत आतापर्यंत किती राष्ट्राध्यक्षांना नोबेल पुरस्कार? ट्रम्पही ‘त्या’ यादीत येणार का? व्हाईट हाऊसकडून…

जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेला नोबेल शांतता पुरस्कार 2025 आज (शुक्रवार) जाहीर होणार आहे.

America Donald Trump (2)

America Nobel Prize 2025 Donald Trump : जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेला नोबेल शांतता पुरस्कार 2025 आज (शुक्रवार) जाहीर होणार आहे. पण या घोषणेच्या आधीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच दावा केला आहे की, हा पुरस्कार मलाच मिळायला हवा. गुरुवारी व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक फोटो शेअर करण्यात आला. त्या फोटोसोबत The Peace President (शांतीचा राष्ट्राध्यक्ष) असा मजकूर दिला होता. हा फोटो आणि त्यामागचा प्रचार हा ट्रम्प यांच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठीच्या मोहिमेचा एक भाग मानला जातो.

मी सात शांतता करार घडवून आणले…

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दोन्ही कार्यकाळात अनेकदा असा दावा केला आहे (Nobel Prize 2025) की, त्यांनी जगातील सात मोठे शांतता करार घडवून आणले, ज्यात भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शमवण्याचं मध्यस्थी काम त्यांनी केल्याचा समावेश आहे. ट्रम्प (America) म्हणाले की, मी जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सात मोठी पावलं उचलली आहेत, पण नोबेल समिती (Donald Trump) नेहमीच मला दुर्लक्षित करते.

2025 साली पुन्हा नामांकन

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांना त्यांच्या दोन्ही कार्यकाळात अनेकदा नामांकन मिळाले आहे. यंदाही त्यांचं नाव चर्चेत आहे. यावेळी त्यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट, काही अमेरिकन सिनेटर्स आणि अगदी पाकिस्तान सरकारनेही नामांकित केलं आहे.

किती अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नोबेल पुरस्कार?

इतिहासात आतापर्यंत फक्त चार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि एक उपराष्ट्राध्यक्षाला हा सन्मान मिळाला आहे.

1. थिओडोर रूझवेल्ट (1906) — रशिया-जपान युद्ध संपवण्यासाठी पोर्ट्समाउथ करार घडवून आणल्याबद्दल पहिला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून सन्मान.
2. वुड्रो विल्सन (1919) — पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्स स्थापन करण्यातील योगदानासाठी.
3. जिमी कार्टर (2002) — अध्यक्षपद सोडल्यानंतर 21 वर्षांनीही जागतिक शांततेसाठी, मानवाधिकारांसाठी आणि सामाजिक विकासासाठीच्या प्रयत्नांबद्दल.
4. बराक ओबामा (2009) — आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंध, अण्वस्त्र निर्मूलन आणि जागतिक सहकार्य वाढवण्यासाठीच्या उपक्रमांसाठी.

व्हाईट हाऊसकडून जोरात प्रचार

तसेच, अल गोर (2007) हे अमेरिकेचे एकमेव उपराष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला. त्यांनी जागतिक हवामान बदलाबाबत जनजागृती आणि संशोधनासाठी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार मिळवला होता. ‘The Peace President’ या घोषवाक्यासह ट्रम्प यांचा प्रचार व्हाईट हाऊसकडून जोरात सुरू आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला दोघांचीही सहमती मिळाल्यानंतर व्हाईट हाऊसने ही मोहीम आणखी गती दिली आहे.

आता सर्वांचे लक्ष नॉर्वेतील ओस्लो येथे होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. ट्रम्प यांचा आत्मविश्वास जरी प्रचंड असला तरी नोबेल समितीचा अंतिम निर्णय काय असेल, हेच पाहणं बाकी आहे.

follow us