महायुतीचं ठरलं! शिंदेंना नगरविकास खाते फिक्स, अजित पवारांचं काय?
Eknath Shinde Will Get Post Of Deputy CM Urban Development Minister : राज्यात पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra Politics) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री, अजित पवार यांना वित्तमंत्री तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नगरविकास खाते दिले जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय.
मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला (Maharashtra CM) आहे. यावेळी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री देखील शपथ घेणार आहेत. आता या शपथविधी सोहळ्याला फक्त काही तास उरले आहेत. दरम्यान शिवसेनेमध्ये मंत्रिपदासांठी लॉबिंग सुरू असल्याचं समोर आलोय. शिवसेनेचे जेष्ठ निवडक नेते उद्या मुंबईत राहणार आहेत. नेत्यांमधील नाराजी टाळण्यासाठी खात्यांपर्यंत गुप्तता पाळली जातेय.
महायुतीचं ठरलं! फडणवीसांच्या नावावर आज शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेही घेणार शपथ?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 7 आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार अशल्याची माहिती मिळते. तर माजी मंत्र्यांच्या यादीमधून तिनजणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं समोर येतंय. त्याचप्रमाणे अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर असलेल्या माजी मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळ मिळण्याची शक्यता आहे.
तीव्र विरोध अन् संताप..फक्त सहाच तासांत दक्षिण कोरियाने मागे घेतला मार्शल लॉ
महायुतीमध्ये सरकार स्थापनेच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू आहेत. या शपथविधीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील निमंत्रित करण्यात आलंय. यासोबतच 19 राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 100 संत-महंत देखील उपस्थित राहणार आहे. तर दहा हजार भाजपचे कार्यकर्ते देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत.