शिंदेंच्या शिलेदाराची हत्या! हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या, पंजाबमधील धक्कादायक घटना

Eknath Shinde Shiv Sena Party District Shot Dead In Punjab : राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिलेदाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील मोगा येथे शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास, मंगा दूध आणण्यासाठी मोगा येथील गिल पॅलेसजवळील एका डेअरीत गेले होते, तिथेच तीन गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केलाय.
यामध्ये मंगत राय मंगा यांना गोळी लागली (Panjab) नाही, तर तिथे असलेल्या एका 11 वर्षाच्या मुलाला गोळी लागली. मंगत राय मंगा त्यांची अॅक्टिव्हा सोडून तिथून पळाले, तेव्हा हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. स्टेडियम रोडवर थोड्या अंतरावर त्याच्यावर गोळीबार केला अन् पळून गेले. माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलंय. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला.
‘नाराज नाही… मला बोलायची चोरी झालीय’, जयंत पाटलांचं सूचक विधान
विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा म्हणाले की, मंगत राय मंगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्यांची हत्या गुंडांनी गोळ्या घालून केली. दरम्यान, मंगत राय मंगा यांच्या मुलीनं म्हटलंय (Mangat Rai Manga Shot Dead) की, त्यांचे वडील रात्री 8 वाजता दूध आणायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. 11 वाजता कोणीतरी वडिलांना गोळी लागल्याची आणि त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी दिली. आम्हाला न्याय हवा आहे, यासाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही करू, असं देखील त्यांची मुलगी म्हटली आहे.
“घर पेटवलं, लहान मुलींनाही मारहाण, आम्हाला न्याय द्या”, खोक्या भोसलेच्या बहिणीने काय सांगितलं?
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मंगत राय मंगा यांची गुरुवारी रात्री उशिरा मोगा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी पंजाबमधील विविध हिंदू संघटनांचे नेते मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Panjab Crime) पोहोचलेत. सर्वांनी मोगा प्रशासनाकडे मागणी केली की, आरोपींना पकडून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, त्यानंतरच मंगत राय यांचे शवविच्छेदन केले जाईल. यानंतर कुटुंबीयांसह सर्व संघटनांनी थापर चौकात निदर्शने केल्याचं समोर आलंय. या हत्येमागील नेमकं कारण काय होतं? ते अजून समजलेलं नाही. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.