‘नाराज नाही… मला बोलायची चोरी झालीय’, जयंत पाटलांचं सूचक विधान

‘नाराज नाही… मला बोलायची चोरी झालीय’, जयंत पाटलांचं सूचक विधान

Jayant Patil Reaction On Talk Of Joining Other Party : माझी काही गॅरंटी नाही, असं विधान काल जयंत पाटलांनी (Jayant Patil) केलं होतं. त्याच्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मी नाराज वैगेरे काही नाहीये. मला बाहेर बोलायचीच चोरी झाली आहे. मी जे भाषण केलंय, त्याचा रेफरन्स तुम्ही (Sharad Pawar) काढा. शक्तीपीठ रस्त्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी मी भाषण केलंय.

राजु शेट्टी यांनी झेंडा हातामध्ये घेतलाय म्हटल्यावर काळजीचं काही कारण नव्हतं. तो विनोदाचा एक भाग होता. राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे तुम्ही माझं गृहीत धरू (Jayant Patil News) नका, तुमचं आंदोलन सुरू ठेवा. त्याला आमचा पाठिंबा आहे, अशी यामागे भावना होती.

पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ! प्रकरण काय?

पण प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की, काहीही केलं तरी मला कुठे तरी धकलायचं. पवार साहेब आणि आम्ही एका कुटुंबातील आहे. आम्ही एकमेकांना इशारे देत बसत नाही. जरी आमच्या पक्षाचा पराभव झाला असला, तरी आम्ही पक्षाच्या हिताचाच निर्णय घेऊ. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. शेवटी राजकारणात सर्वांशी संबंध चांगलं ठेवणं गरजेचं असते. वैयक्तिक वैर न घेणं, हे मी पवार साहेबांकडून शिकलो असल्याचं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय.

अजित पवारांची नवी सुनबाई आहे तरी कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हाला आनंद…

आमचा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असून आम्ही पक्षाच्या हिताचाच निर्णय घेऊ. त्यामुळे मी कुठे जाणार हा विषय होणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तर मल्हार सर्टिफिकेटवरून देखील त्यांनी सत्ताधारी सरकारला घेरलंय. हे खूपच धक्कादायक असून असा प्रचार चुकीचा असल्याची टीका नाना पटोले, यांनी केलीय. नितेश राणे माणुसकीच्या बाहेर जावून बोलत आहे. दुसऱ्या धर्माची हेटाळणी करणं चुकीचं असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube