अजित पवारांची नवी सुनबाई आहे तरी कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हाला आनंद…

Who Is Jay Pawar Wife Rutuja Patil : पवार कुटुंबात सध्या लगीनघाई सुरू आहे. अजित पवारांचे (Ajit Pawar) धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांचं लग्न ठरलंय. येत्या 10 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळतेय. तर जय पवार यांचं ऋतुजा पाटील नावाच्या तरूणीसोबत लग्न होत आहे. अजित पवारांच्या धाकट्या सुनबाई ऋतुजा पाटील (Rutuja Patil) कोण आहेत, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.
तर जय पवार आणि ऋतुजा पाटीलचे साखरपुडा होण्याअगोदर काही फोटो समोर आलेत. हे फोटो मोदीबागेतील शरद पवारांच्या घरातील आहेत. तर जय आणि ऋतुजाने साखरपुडा होण्याअगोदर आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्याचं दिसतंय. तसंच त्यांनी साखरपुड्याचं निमंत्रण देखील शरद पवार यांना दिलंय. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित असल्याचं दिसतंय.
विराट-रोहित-जडेजाला होणार कोट्यवधींचे नुकसान तर गिल-जैस्वालला लागणार जॅकपॉट, कारण काय?
सुप्रिया सुळेंनी देखील यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिलीय. तर पवार कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण आहे. अजित पवार अन् सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार आणि जय पवार ही दोन मुलं आहेत. काल आम्ही सर्वजण ऋतुजाला भेटलोय. काल आमची होणारी सून ऋतुजा घरी आली होती, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. जयचं लग्न ठरल्यामुळे आम्हाला आनंद होतोय, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी आणि पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या असल्याची माहिती मिळतेय. सोबतच ऋतुजा पाटील उच्चशिक्षित देखील आहेत. गेल्या काही वर्षांपासून जय पवार आणि ऋतुजा पाटील एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितलं जातंय.
‘स्वतःमध्ये डोकावून पाहा…’ पाकिस्तानकडून रेल्वे अपहरणाचा आरोप, भारत सरकार संतापलं
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जय पवार मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. निवडणुकीनंतर जय पवार प्रथमच शरद पवारांच्या भेटीला आल्याची माहिती आहे. जय पवार यांच्या लग्नामुळे पवार कुटुंबात मोठं आनंदाचं वातावरण आहे.