Sanjay Pawar : निवडणुका लावा कोणाचा नाच होतो कळेल; ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपवर पलटवार
कोल्हापूर : नुकताच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यावरून आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. यालाच प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी शेलार यांच्यावर टीका केली आहे. ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा मेळावा नाच गाणं वाटत असावा, असं संजय पवार म्हणालेत. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना व भाजपात वाद रंगला आहे.
ठाकरेंचा मेळावा म्हणजे नाचगाणं, अशी टीका भाजपकडून (BJP) करण्यात अली होती. ठाकरेगटाचे नेते संजय पवार यांनी भाजपच्या या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर उत्तर दिलं आहे. ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा कालचा मेळावा नाच गाणं वाटत असावा, असं संजय पवार म्हणालेत. निवडणुका लावा कोणाचा नाच होतो कळेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. बाळासाहेब ठाकरे हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्वतःचा बाप लक्षात ठेवायला सांगितलं आहे, असं संजय पवार म्हणालेत.
पुढे बोलताना संजय पवार म्हणाले, दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेनेचे रसायनच वेगळं आहे. कोणी कितीही कुरघुड्ड्या केल्या तर काही फरक पडत नाही. कारण शिवसेनाप्रमुखांनी कट्टर शिवससैनिक तयार केला आहे. एक नवीन ऊर्जा व ताकद देणारी ही सभा पार पडली आहे. म्हणून भविष्यात कोणी आमच्यावर टीका टिप्पणी करू नये असे पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली मात्र दुसरे जण बाळासाहेबांचं नाव वापरून दुसरा पक्ष स्थापन करत असले तर चीड निर्माण होणारच. तुमच्यात हिंमत असेल तर ज्या पक्षात स्वार्थापोटी गेलात त्यांच्या नावाने विजय मिळवून दाखवावा. तुम्ही मोदी- फडणवीसांचे फोटो लावा. मात्र बाळासाहेबांचा फोटो लावल्याशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणून तुम्हाला स्वार्थासाठी बाळासाहेब पाहिजे, अशा शब्दात पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
राज्यपालांवर निशाणा…
राज्यपाल यांनी तटस्थ राहणे गरजेचे आहे. राज्यपालांनी केलेलं काम हे एका व्यक्तीसाठी तसेच एका पक्षासाठी होत. अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या अडवणूक केली. महापुरुषांचा वारंवार अवमान राज्यपालांनी केला आहे. तरी माझी मोदींना विनंती आहे की त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्या. त्यांना दुसऱ्या कोणत्या राज्यात पाठवायचे ते पाठवा पण त्यांना महाराष्ट्रातून घालावा असे पवार म्हणाले. on ashish shelar Shivsena BJP