नाना पटोलेंच्या ऑफरवर एकनाथ शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया, ‘भगव्या रंगात न्हाऊन …’

Eknath Shinde On CM Post Offer By Nana Patole : राज्यभरात आज होळी (Holi) मोठ्या उत्साहात सुरू आहे. काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांना होळीची एक खास ऑफर दिली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्याकडे या, आलटून-पालटून मुख्यमंत्री करू, असं नाना पटोले म्हणाले होते.
यावर भगवा रंग ज्याला आवडेल, त्याने सोबत यावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. भगव्या रंगात न्हाऊन निघावं, असं वाटतं त्यांनी सोबत यावं. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
अजित पवारांची नवी सुनबाई आहे तरी कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हाला आनंद…
नाना पटोले काय म्हणाले होते?
पटोले म्हणाले होते की, या दोघांनी (अजित पवार आणि एकनाथ शिंदे) यांनी सतर्क झालं पाहिजे. अलर्ट झालं पाहिजे. आम्ही सोबत आहोत, त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुरक्षेबद्दलची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे. बुरा न मानो होली है. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्ही त्यांच्या सपोर्टला राहू. या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायची अपेक्षा लागलेली आहे. आम्ही तसं त्या ठिकाणी पाहु कसं आलटून पालटून मुख्यमंत्रिपद द्यायचं ते. परंतु भाजपमध्ये ते मुख्यमंत्री होवू शकत नाही.
एकनाथ शिंदे यांचं उत्तर
भगवा रंग ज्याला आवडेल, भगवा रंग ज्याला परवडेल. त्यांनी सोबत यावं. भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे. भगवा रंग हा वैश्विक आहे. भगवा रंग हा सनातन आहे. हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा, दुश्वास करणारा नाही. सगळ्यांना सोबत घेवून जाणारा आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल, या भगव्या रंगामध्ये न्हाऊन निघावं आणि सोबत यावं. अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो.
विराट-रोहित-जडेजाला होणार कोट्यवधींचे नुकसान तर गिल-जैस्वालला लागणार जॅकपॉट, कारण काय?
नाना पटोले यांना होळीच्या दिवशी माझा एक चांगला सल्ला आहे. जनतेमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळवा. हे त्यांच्यासाठी योग्य आहे. अशा ऑफर वैगेरे महायुतीचे नेते ऐकत नाही. आमच्या डबल इंजिन सरकारचं 14 कोटी लोकांच्या विकासाचं ध्येय आहे, त्यामुळे अशा ऑफर्स वैगेरे देत बसण्यापेक्षा तुम्ही देखील विकासासाठी प्रयत्न करा, असा टोला कॉंग्रेसला महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.