Shiv Sena : अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिंदेंच्या शिवसेनेला हादरे; आमदारांना परतीचे वेध

Shiv Sena : अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिंदेंच्या शिवसेनेला हादरे; आमदारांना परतीचे वेध

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राज्य सरकरामधील एन्ट्रीनंतर शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुमत असताना अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल शिंदेंचे आमदार विचारताना पाहायला मिळत आहे. तर काही आमदार हे काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच या नाराज आमदारांना आता ठाकरेंकडे परतीचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली आहे. (Shiv sena Eknath Shinde camp want to join Thackeray group again after Ajit Pawar join Shinde Government)

Letsupp Special : मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? लवाजमा सोडून सामंत यांच्या केबिनमध्ये

साम वृत्तवाहिनीशी बोलताना देसाई म्हणाले, सादला प्रतिसाद देऊ आम्ही. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की सकारात्मक विचार करु. हा यु-टर्न आहे किंवा भाजपवर दबाव आहे का? असं विचारला असता देसाई म्हणाले, आपल्या राजकारणाची ही पद्धत आहे, कोणी आपल्याला प्रस्ताव दिला, साद घातली तर आपण एकदम नाही म्हणत नाही. आपण त्यावर विचार करु असं म्हणतो. आता विचार करणारा मी एकटा नाही, आमचे नेते आहेत, उपनेते आहेत.

ही बदलत्या राजकारणाची गरज आहे का? यावर देसाई म्हणाले, बदलत्या राजकारणाचा प्रश्न नाही, यापूर्वी मी किंवा आमच्या पक्षातील नेते उद्धव ठाकरेंना हेच म्हणत होतो की आपल्याला महाविकास आघाडी नको. आपण भाजप-शिवसेनेसोबत नैसर्गिक युती करु. या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद द्यावा, अडीच वर्ष जे झालं ते झालं याला आपण दुरुस्त करु हीच आमची भूमिका होती. आजही आमची तीच भूमिका आहे. त्यामुळे तसा जर कोणता प्रस्ताव आला तर आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ असं देसाई यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज मंत्रिमंडळ बैठक झाली. मंत्रिमंडळातील बैठक झाल्यानंतर काही आमदार हे मुख्यमंत्री यांना भेटले. राज्यात सरकारचे बहुमत असताना राष्ट्रवादी काँगेसला सोबत घ्यायची आवश्यकता का होती? असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. चार ते पाच आमदार यांची समजूत काढता-काढता मुख्यमंत्री यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

आमदार व मुख्यमंत्र्यांमध्ये केबिनमध्ये वाद वाढत होता. मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर देखील भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती. या सर्वांतून मुख्यमंत्री कुठलाही लवाजमा न घेता बाहेर पडले. त्यांनी सहाव्या मजल्यावर लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि थेट एकटेच पहिल्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांची केबिन गाठली. समर्थक आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री चिंतेत असल्याचे देहबोलीवरून दिसून येत होतं.

एका वर्षासाठी तात्पुरतं सत्तेत जाण्यात काय अर्थ? रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

उदय सामंत यांच्या केबिनजवळ आलेल्या अनेक लोकांना मुख्यमंत्री एकटे कसे आले याचा आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री हे उद्योगमंत्री यांना थेट बोलवून घेऊ शकले असते. पण ते स्वतः उद्योगमंत्री सामंत यांच्या केबिनला आले. सुमारे अर्धातास अँटी चेंबरला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना आमदारांमध्ये पसरलेली नाराजी आणि संध्याकाळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची होणारी बैठक यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube