LetsUpp Special :मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? लवाजमा सोडून सामंत यांच्या केबिनमध्ये

  • Written By: Published:
LetsUpp Special :मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? लवाजमा सोडून सामंत यांच्या केबिनमध्ये

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज मंत्रिमंडळ बैठक झाली. मंत्रिमंडळातील बैठक झाल्यानंतर काही आमदार हे मुख्यमंत्री यांना भेटले. त्यातून वाद झाला आहे. त्यातून ते उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटण्यासाठी एकटेच गेले. (cm-eknath-shinde-meet-minister-udhay-samant)

परंतु शिंदे गटाकडून हे वृत्त फेटाळून लावण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उदय सामंत ह्यांच्या केबिनमध्ये वॉशरूमला जाण्यासाठी आले होते, आणि त्यांच्या अँटी चेंबरमध्ये मोजून 3 मिनिटे होते. उदय सामंत यांच्याबरोबर मी पण जिथे हजर होतो. 6 व्या मजल्यावर त्यांच्या ऑफिसमध्ये खूप गर्दी होती म्हणून त्या गर्दीला टाळण्यासाठी ते खाली आले असल्याचे एका नेत्याकडून सांगण्यात आले आहे.


Photo’s : उपमुख्यमंत्रापदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मंत्रालयात; मंत्रिमंडळ बैठकही पार पडली

राज्यात सरकारचे बहुमत असताना राष्ट्रवादी काँगेसला सोबत घ्यायची आवश्यकता का होती ? असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आहे. चार ते पाच आमदार यांची समजूत काढता-काढता मुख्यमंत्री यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आमदार व मुख्यमंत्र्यांमध्ये केबिनमध्ये वाद वाढत होता. मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर देखील भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती. या सर्वांतून मुख्यमंत्री कुठलाही लवाजमा न घेता बाहेर पडले होते.
सहाव्या मजल्यावर लिफ्टमध्ये प्रवेश केला. थेट एकटेच पहिल्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांची केबिन गाठली आहे. समर्थक आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री चिंतेत असल्याचे देहबोलीवरून दिसून येत होता.

Sunil Shelke : सत्तेत जायचं हे सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच ठरलं, आमदार शेळकेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

उदय सामंत यांच्या केबिनजवळ आलेल्या अनेक लोकांना मुख्यमंत्री एकटे कसे आले याचा आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री हे उद्योगमंत्री यांना थेट बोलवून घेऊ शकले असते. पण ते स्वतः उद्योगमंत्री सामंत यांच्या केबिनला आले. सुमारे अर्धातास अँटी चेंबरला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना आमदारांमध्ये पसरलेली नाराजी आणि संध्याकाळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची होणारी बैठक यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही आमदारांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडताना काही सारवासारव केली आहे. परंतु मुख्यमंत्री एकटेच पाटव्या मजल्यावरून उद्योगमंत्री व त्यांच्या केबिनमध्ये गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube