प्राणाचं रक्षण केलं, धाडसी पोलीस अधिकारी केंद्रेंना बादल कुटुंब नतमस्तक, रोख बक्षीसही जाहीर

Sukhbir Singh Badal familes gratitude सुखबीर सिंग बादल यांना हल्ल्यातून बचावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याप्रती बादल कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली.

Sukhbir Singh Badal Familes Gratitude

Sukhbir Singh Badal familes gratitude to brave police officer Kendre after attack also announced cash reward : गुरूवारी 13 ऑगस्ट रोजी नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांना एसपीयूचे निरीक्षक संतोष केंद्रे यांनी चपळाईने हल्लेखोराला रोखले. मात्र केंद्रे या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. यावेळी कृतज्ञता म्हणून बादल यांचे कुटुंब केंद्रे यांना भेटायला गेले. सुखबीर सिंग यांचे प्राण वाचवले म्हणून त्यांना सुखबीर सिंग यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांनी पाच लाख रूपये रोख बक्षीस जाहीर केले.

पुण्यातील चरणोदक प्राशनाच्या व्हिडीओंनी निर्माण केला वाद; उमेश तागुंदे म्हणाले, भक्तांची भावना आहे

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेत एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.

जनगणना फेज 2 साठी 40 प्रश्न जाहीर; जात-धर्मापासून कोविड लसीपर्यंतचे प्रश्न, वाचा यादी

नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका निहंग शीख व्यक्तीने नांदेडमधील गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर हल्ला केला. हाताला दुखापत झाल्यानंतर बादल यांना रुग्णालयात नेण्यात आले. सुखबीर सिंग बादल पत्नी हरसिमरत बादल (Harsimrat Badal) आणि कुटुंबासह प्रार्थना करण्यासाठी नांदेड येथील ‘तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा’ येथे गेले होते. या भेटीदरम्यान, एका निहंग शीख व्यक्तीने त्यांच्यावर ‘कृपाण’ ने (धार्मिक तलवार) हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा बादल यांनी प्रयत्न केला, परंतु कृपाणच्या वारामुळे त्यांच्या हातावर जखम झाली.

सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ला

सुखबीर सिंग बादल यांच्यावर यापूर्वी देखील जीवघेणा हल्ला करण्यात आले आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला घटनास्थळीच पकडले होते. सुवर्ण मंदिरातील तो हल्ला ते प्रार्थना करत असताना झाला होता. एका बंदूकधाऱ्याने त्यांच्यावर गोळी झाडली, परंतु सुदैवाने ती गोळी त्यांना न लागता भिंतीवर आदळली. त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हल्लेखोराला ताब्यात घेतले.

follow us