ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, नूडल्स खाल्ल्याने विषबाधा? पोलिसांचा तपास सुरू

माहितीनुसार, या कुटुंबाने रात्री सुमारे 10 वाजता चहा, नूडल्स खाल्ले होते. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 17T192851.620

Five members of the same family die in Greater Noida : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा कोतवाली क्षेत्रातील नगला श्री पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये महेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगा लड्डू मुलगी मिष्टी आणि साक्षात यांचा समावेश आहे. एकाच घरातील पाच जणांचा म्रुत्यु झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कुटुंबाने रात्री सुमारे 10 वाजता चहा आणि नूडल्स खाल्ले होते. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिले. त्यावेळी पाचही जण पलंगावर पडलेले दिसले. शेजाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा नवा विक्रम? सलग 7 टक्क्यांहून अधिक विकासदराची शक्यता, आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाज वाढले

त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे देखील निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर पाचही जणांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, वरिष्ठ अधिकारी, रुग्णवाहिका आणि सुरक्षा विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबियांकडून आणि स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र हा घातपात आहे की मृत्यूमागे कोणते वेगळे कारण आहे, याचा शोष पोलीस घेत आहेत.

शवविच्छेदन अहवाल आणि इतर वैज्ञानिक तपासण्यांचे निष्कर्ष समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे दिल्लीतील बुराडी प्रकरणाची देखील आठवण झाली आहे. 2018 मध्ये दिल्लीतील बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 जण मृतावस्थेत आढळले होते. त्या प्रकरणात अंधश्रद्धा आणि सामूहिक आत्महत्येशी संबंधित शक्यतांचा तपास करण्यात आला होता. मात्र, ग्रेटर नोएडामधील साध्याच्य घटनेचा बुराडी प्रकरणाशी कोणताही थेट संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या घटनेबाबत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, या पाच जणांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us