मोठी बातमी! लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् खासदार प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांकडून अटक
Rahul Gandhi : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला मोठं वळण लागलं असून, ठिय्या देणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला आता मोठं वळण लागलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या ८ तासांपासून राहुल गांधी आंदोलनस्थळी ठिय्या मांडून आहेत. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं असून, आंदोलनात सहभागी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही धरपकड सुरु केली आहे.
राहुल गांधी यांच्या आंदोलनादरम्यान पोलिस मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आलं आणि अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. यासोबतच राहुल गांधी यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, विरोधकांच्या आंदोलनाला आता आणखी आक्रमक वळण मिळालं आहे.