साखरेनंतर गूळालाही लागले महागाईचे मुंगळे; सणासुदीआधीच सामान्यांच्या खिशाला कातर
राज्यात साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली असून साखरेचा दर 7,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
साखरेच्या दराने विक्रमी पातळी गाठल्यानंतर (Sugar) आता गुळाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या किरकोळ बाजारात गुळाचा दर 80 ते 85 रुपये किलोवर पोहोचला आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी गूळ 60 रुपये किलो दराने मिळत होता. त्यामुळे पंधरा दिवसांत गुळाच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. दहा किलोची भेली घेतल्यास घाऊक बाजारात गुळाचा दर 70 ते 75 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
इथेनॉलमुळं साखर महाग झाली का?, सर्वसामान्यांच्या खर्चावर किती परिणाम?, सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?
राज्यात साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली असून साखरेचा दर 7,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ बाजारात साखरेचा दर 80 रुपये किलोवर गेला आहे. साखर आणि गुळाच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर परिणाम होण्याबरोबरच मिठाई उत्पादकांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात मिठाईच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
साखर आणि गुळाच्या दरवाढीमागे उत्पादन, पुरवठा आणि बाजारातील मागणीतील बदल हे घटक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. सणासुदीच्या काळात साखर आणि गुळाची मागणी वाढत असताना दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे बाजारातील दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
जिल्हानिहाय साखरेचे दर
मुंबई – 60 ते 65 रुपये किलो
सांगली – 80 रुपये किलो
बुलढाणा – 78 ते 80 रुपये किलो
वाशिम – 78 ते 80 रुपये किलो
कोल्हापूर – 75 रुपये किलो
नाशिक – 75 रुपये किलो
पुणे – 72 रुपये किलो
परभणी – 70 रुपये किलो
सातारा – 70 रुपये किलो
पालघर – 65 ते 70 रुपये किलो
भंडारा – 68 रुपये किलो
जळगाव – 68 रुपये किलो
अकोला – 65 रुपये किलो
रत्नागिरी – 62 रुपये किलो
चंद्रपूर – 60 रुपये किलो
नांदेड – 65 रुपये किलो
लातूर – 70 रुपये किलो
हिंगोली – 70 रुपये किलो
नागपूर – 68 ते 70 रुपये किलो
गोंदिया – 70 रुपये किलो
वर्धा – 62 ते 64 रुपये किलो
अमरावती – 75 रुपये किलो
यवतमाळ – 75 ते 78 रुपये किलो
गडचिरोली – 60 रुपये किलो