Pakistani Sugar : पाकिस्तानकडून साखर खरेदी? पाकिस्तानी कारखानदारांची सरकारकडे मोठी मागणी

Pakistani Sugar : देशात साखरचे भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. वाढत्या भावावर नियंत्रण

Pakistani Sugar

Pakistani Sugar : देशात साखरचे भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या (Raw Sugar) आयातीला मंजुरी देखील दिली आहे. या निर्णयानंतर देशात साखरेचे भाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेजारील राष्ट्र पाकिस्तान भारताला साखर निर्यात करु शकतो अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन ने सरकारकडे भारताला साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याची विनंती केली असल्याचा दावा ‘द न्यूज’ कडून करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यास आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सरकारने भारताला साखर निर्यात करण्याची परवानगी द्यावी असं असोसिएशनच्या एका वरिष्ठ प्रतिनिधीने द न्यूज ला सांगितले आहे.

द न्यूजनुसार (The News) भारताला साखर निर्यात करण्याची परवानगी दिली तर यातून 600 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे परकीय चलन पाकिस्तानला मिळू शकते. पाकिस्तानमधील साखर उद्योगाकडे 1.2 दशलक्ष टनांहून अधिक साखरेचा अतिरिक्त साठा पडून आहे. यामुळे कारखान्यांवर वाढता आर्थिक ताण येत आहे, जे सध्या आगामी ऊस गाळप हंगामाच्या तयारीमध्ये व्यस्त असल्याची माहिती देखील या अहवालात देण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तान तणाव

तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर ही मागणी करण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवला होता. तसेच सिंधू जल करार देखील स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

‘पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन’चे चौधरी मुहम्मद वाहीद यांनी सांगितले की, शेजारील देश असल्याने भारतीय बाजारपेठेत साखर पुरवण्यासाठी पाकिस्तानची स्थिती अनुकूल आहे. दूरवर असलेल्या पुरवठादारांच्या तुलनेत यामुळे वाहतूक खर्च कमी येऊ शकतो. 15 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानकडे 2.81  दशलक्ष टन साखरेचा साठा उपलब्ध होता, तर देशांतर्गत सरासरी मासिक वापर 0.55 दशलक्ष टन इतका आहे. वहीद यांच्या मते, किमान डिसेंबर 2026  च्या अखेरपर्यंत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.

साखरेचे भाव कमी होणार, सरकार अ‍ॅक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

साखरेच्या घाऊक दरात वाढ

घाऊक बाजारात अहमदाबादमध्ये साखरेचा दर प्रति क्विंटल 6,405 रुपये होता, यापूर्वी दर 525 रुपये होता. कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर प्रति क्विंटल 6,562.50 रुपयांवर पोहोचले आहे. या दोन्ही ठिकाणी 472.50 रुपयांची वाढ नोंदवली गेली. कोल्हापुरात दर 446.25 रुपयांनी वाढून 6,405 रुपये प्रति क्विंटल झाला, तर दिल्लीत 420 रुपयांच्या वाढीसह तो 6,510 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. कानपूरमध्ये साखरेचा दर 6,531 रुपये प्रति क्विंटल आहे, तर बेंगळुरूमध्ये 6,457.50 रुपये आणि मुझफ्फरनगरमध्ये 6,468 रुपये दर नोंदवले गेले.

follow us