शेजारचे राज्य कर्नाटक पाडणार कृत्रिम पाऊस; आपले सरकार काय निर्णय घेणार ?

El Niño 2026: बंगळुरू येथील HAL विमानतळावरून या विमानाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या प्रकल्पासाठी राज्य सरकार तब्बल 28.52 कोटी रुपये खर्च करणार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Karnataka

Drought-hit Karnataka launches Rs 28.52-cr cloud seeding operations : एल निनोचा (El Nino) मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने कृत्रिम पाऊस (cloud seeding operations) पाडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शेजारच्या कर्नाटकच्या काँग्रेसने निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार काय निर्णय घेणार आहे, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

जलसंपदा मंत्री एन. चलुवरायस्वामी यांनी क्लाउड सीडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष हलक्या विमानाचे उद्घाटन केले. बंगळुरू येथील HAL विमानतळावरून या विमानाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या प्रकल्पासाठी राज्य सरकार तब्बल 28.52 कोटी रुपये खर्च करणार आहे. मंत्री चलुवरायस्वामी यांनी हा प्रकल्प यशस्वी ठरून राज्यातील पाणी संकट कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली.


सोनिया गांधींच्या ‘Belonging: A Journey of Love’ आत्मचरित्र 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार; नवा प्रकाशक कोण ?

यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. नैऋत्य मोसमी पाऊस या महिन्याच्या अखेरीस संपेल. या महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेसा पिण्याचा पाणीसाठा करता आला नाही, तर पुढील वर्षी जूनपर्यंत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे जलसंपदामंत्री यांचे मत आहे. यापूर्वी राबवण्यात आलेले क्लाउड सीडिंग अभियान 35 टक्के यशस्वी ठरले होते. मात्र, यावेळी आर्थिक खर्चाचा विचार न करता राज्यातील जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यात येत असल्याचे चलुवरायस्वामी यांनी स्पष्ट केले.


पिकं करपली, चारा संपला; मराठवाड्यात शेतकऱ्यांवर उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ


क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

क्लाउड सीडिंगच्या प्रक्रियेत ढगांमध्ये असलेल्या आर्द्रतेचे पावसाच्या रूपात रूपांतर व्हावे यासाठी वातावरणात विशिष्ट रसायनांचा कृत्रिमरीत्या फवारा केला जातो. ढगांचा प्रकार—उष्ण किंवा थंड—यावर कोणते रसायन वापरायचे हे ठरवले जाते. या अभियानात सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड, ड्राय आइस आणि सोडियम क्लोराइड (सामान्य मीठ) यांचा वापर केला जाणार आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, क्लाउड सीडिंगची प्रक्रिया केल्यानंतर साधारण 30 मिनिटे ते 1 तासाच्या आत पाऊस पडण्याची शक्यता असते.

हवामान विभागाच्या रडारद्वारे सतत देखरेख
या अभियानावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने विशेष निगराणी समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन तासांनी परिस्थितीचा आढावा आणि अद्ययावत माहिती देणार आहे. तांत्रिक पथक हवामानातील परिस्थिती, वाऱ्याचा वेग आणि ढगांची घनता यावर सतत लक्ष ठेवणार आहे. यासाठी हवामान विभागाच्या डॉप्लर रडारची मदत घेतली जाणार आहे.

गरजेनुसार विमानाची उड्डाणे
क्लाउड सीडिंगसाठी कोणते जिल्हे आधीच निश्चित केले जाणार नाहीत. तांत्रिक पथकाकडून मिळणाऱ्या अहवालाच्या आधारे ज्या भागात पावसाची कमतरता आहे, प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची गरज आहे किंवा शेती संकटात आहे, अशा ठिकाणी योग्य ढग आढळल्यास विमान तातडीने पाठवले जाणार आहे.

follow us