गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई-गोवा, अटल सेतूसह मुंबई-बंगळुरू महामार्गावर टोलमाफी

Ganesh Chaturthi 2026: मुंबई-गोवा महामार्गासोबतच मुंबई-बंगळुरू महामार्ग आणि अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Ganesh Ustav

Ganesh Chaturthi 2026: आगामी गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2026) कोकणासह राज्याच्या विविध भागांत जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनांसह एसटी बसना टोलमधून पूर्णपणे सूट देण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गासोबतच मुंबई-बंगळुरू महामार्ग आणि अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वाहतूक कोंडीविना व्हावा, यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून विशेष नियोजन करण्यात आले आहे.


मोदींच्या कार्यक्रमातील बनावट आयडी प्रकरणात तिसऱ्या आरोपीचं कनेक्शन समोर; नेमकं कोण आहे प्रथमेश बागुल?


11 ते 27 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी

राज्य सरकारच्या निर्णयानुसार 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. या टोलमाफीमध्ये प्रमुख मार्गांचा समावेश आहे.
अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमधून सूट मिळणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.


गोंधळ, गंमत आणि ‘मांजर’चं गूढ… ट्रेलरने वाढवली उत्सुकता ! 18 सप्टेंबरला होणार उलगडा

टोलमाफीसाठी ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ पास
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ असा विशेष पास किंवा स्टिकर लावणे आवश्यक असेल. या पासवर संबंधित वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. हा पास गणेशभक्तांना जवळचे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी आणि आरटीओ कार्यालयात मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, कोकणात जाताना वापरलेला हाच पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना ये-जा करताना टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.

एसटी बसेसनाही टोलमाफी
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसनाही टोलमधून पूर्ण सूट देण्यात आली आहे. एसटी बसेससाठी पोलीस आणि आरटीओच्या समन्वयातून विशेष पासची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह प्रमुख महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग, आरटीओ आणि एसटी महामंडळ यांच्यात समन्वय साधून विशेष वाहतूक नियोजन करण्यात येत आहे.

follow us