Chitra Wagh : तुमची चॉईसचं वेगळी आहे…; मोठ्या ताई म्हणत चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर ‘वर्मी’ घाव
Chitra Wagh vs Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून भाजपवर प्रखर टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घडामोडींवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना
₹100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? @supriya_suleगुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री त्यांना आवडणार नाहीच.
– महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी… pic.twitter.com/mFZDouGhTx
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2023
100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा देवेंद्र फडणवीस त्यांना आवडणारच नाही, असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Video : आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात…
राज्याच्या मोठ्ठ्या ताई.. सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही कारण.. ससून प्रकरणात 9 पोलीस निलंबित झाले पण, तुम्हाला आवडले नसेल कारण.. हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या पण, तेही तुम्हाला आवडले नसेल कारण.. कारण, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री..
तुम्हाला हवे काय?
आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री.. उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री.. तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र तरी काय करणार महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?
पवारांचे थेट वार! अजितदादांचे मुख्यमंत्रीपद स्वप्नचं राहणार; UN चा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी…
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?
देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते. हे मी म्हणत नाही, तर डाटा सांगतो. नागपूर ही क्राईम सिटी झाली. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. ते मुख्यमंत्री झाले पहिला हार मीच घालणार. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ही संधी मला द्यावी. अजित पवारांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद देऊ नये, असेही सुळे म्हणाल्या होत्या.