पुण्यात राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचं आंदोलन, काय आहेत मागण्या?
या आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी येरवडा येथील राज्य जीएसटी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
राज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. ८) द्वारसभा घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. अनेक वेळा लेखी निवेदने, बैठका आणि चर्चेनंतरही प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
या आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी येरवडा येथील राज्य जीएसटी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
विमानतळ रस्ता होणार वाहतूक कोंडीमुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच
मंगळवारी सर्व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले, तर बुधवारी सामुदायिक रजा देऊन पुढील आंदोलन छेडले जाणार आहे.
या आंदोलनावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. विकास शेवाळे, सहसचिव डॉ. किर्ती-राज जाधव, सौ. संगिता दरेकर, सदस्य प्रवीण काळे, अभिजीत गायकवाड, पूजा डोणगापुरे तसेच मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते.
