सहा खासदारांना पैसे पुरवायची जबाबदारी मराठीवाड्यातील मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला होती; खैरेंचा खळबळजनक दावा

UBT Split Ex MP Chandrakant Khaire यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत यावर एक खळबळजनक दावा केला आहे.

UBT Split Ex MP Chandrakant Khaire

UBT Split Thackreys Ex MP Chandrakant Khaire sensational claim contractor from Marathwada provide funds to six MP : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहेत. हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या दरम्यान ठाकरेंचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

फुटून गेलेले सहाही खासदार व्हिप बजावल्यानंतरही आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. कारण त्यांना ठाकरेंनी त्यांना सर्व काही पत्र वैगेरे पाठवलं होतं. तरी त्यांनी पक्षाशी द्रोह केला. माशालीवर निवडून आले आणि आता गद्दारी केली. ही फक्त पक्षाशीच नाही तर मतदारांशी देखील केली आहे.

कितीही कारणे द्या,सत्य एकच तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे… ओमराजेंसह सहाही खासदारांवर आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

सध्या शिंदेंच्या गटातून काहीही बोललं जात आहे. त्यात वाघमारेबाई म्हणाल्या की, संजय राऊतांसाठी आम्ही ठाण्यात हॉस्पिटल तयार केलं आहे. पण तिच्या वडिलांनी किती वाघ मारले माहिती नाही. मात्र काळ बदलतो सरकार येतं जातं. तेव्हा तुम्हालाच त्याची गरज पडणार आहे. अति झालं आता आमचे दिवस येतील.

भारतीयांच्या ठेवी पन्नास टक्क्यांनी वाढल्या ! स्विस बँकांची नवी माहिती; या बँकेत भारताचे किती पैसे ?

एका महिन्यापूर्वी एका सांगितलं होतं की, टोकण पण तेव्हाच वाटप झाले होतो. मराठवाड्यातलाच एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला ही जबाबदारी दिली होती, हे सहा खासदाराचे पैसे तू पुरवायचे. हे सहा लोकांचे पैसे त्या ठिकाणी तुम्ही देऊन टाका आणि तुम्हाला आम्ही मोठं काम देऊ. म्हणजे तिथल्या तिथं त्यांनी सगळं सरवा सारवी केली आणि तिकडं जा तुम्ही असं करा आणि म्हणून त्या माणसाने त्या ठिकाणी यांना पैसे ऑलरेडी घरपोच पोहोचवले आणि मग हे केले.असा खळबळजनक दावा ठाकरेंचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

 

follow us