Ranji : रणजी खेळाडूंची होणार चांदी! पगारवाढीसाठी बीसीसीआयचा खास प्लॅनही तयार

Ranji : रणजी खेळाडूंची होणार चांदी! पगारवाढीसाठी बीसीसीआयचा खास प्लॅनही तयार

Ranji Trophy Playre’s Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच रणजी खेळाडूंना गुडन्यूज देण्याचा विचार करत आहे. अलीकडेच बीसीसीआयने (BCCI) कसोटी क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय (Ranji Trophy Player’s Salary) घेतला होता. या निर्णयानुसार टीम इंडियातील खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याच्या मोबदल्यात 15 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्याही मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे. बीसीसीआय रणजी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रणजीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सातत्याने काम करत आहे. या अंतर्गत रणजी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळू शकते.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बांगलादेशसाठी आनंदाची बातमी, ‘या’ खेळाडूचं पुनरागमन

सध्याच्या घडीला बीसीसीआय रणजी खेळाडूंना 40 हजार ते 60 हजार रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून देते. हे मानधन सर्व हंगामात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांच्या संख्येवर अवलंबून असते. जर एखादा खेळाडू एका हंगामा सर्व सात गट सामने खेळला तर त्याला वर्षाला सुमारे 11.2 लाख रुपये मिळतात. टी 20 लीग स्पर्धांमुळे अनेक खेळाडू रणजी खेळण्याचे टाळतात. त्यामुळे आता बीसीसीआय या नव्या रणनीतीवर काम करत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टी 20 लीगसाठी 2024 साठी 156 भारतीय खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले होते. यामध्ये 56 खेळाडू असे होते ज्यांनी रणजी ट्रॉफीचा एकही सामना खेळला नाही. तर 25 खेळाडू असे होते ज्यांनी फक्त 1 सामना खेळला. मात्र, आता या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआय एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब

बीसीसीआयने रणजी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला तर रणजी खेळाडू रणजी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर असा निर्णय घेतला गेला तर खेळाडूंचा मात्र नक्कीच फायदा होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube