Hindu Tan-Man Song: ‘मैं अटल हूं’मधील ‘हिंदू तन-मन’ नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Hindu Tan-Man Song Release: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान ‘मैं अटल हूं’मधील “हिंदू तन-मन” गाणं रिलीज करण्यात आला आहे. “हिंदू तन-मन” हे गाण गायक कैलाश खैर यांनी गायलंय. कैलाश खैर यांनी गायलेला गाणं पंकज त्रिपाठीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलाय.
मै हू अटल (Main Atal Hoon) या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वीचं प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून राजकीय कारकिर्द आणि भारतात सत्तापालट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान असे सर्व प्रसंग सिनेमातून दाखवण्यात येणार आहेत. वाजपेयी यांच्या आयुष्यातून अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला सिनेमातून बघायला मिळणार आहेत.
मैं हू अटलमध्ये वाजपेयी यांची भूमिका साकारणारा पंकज त्रिपाठी म्हणाला, “सिनेमापेक्षा मला अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे, ही माझ्यासाठी ह्रदयस्पर्शी गोष्ट होती. अटल बिहारी वाजपेयी यांचं आयुष्य संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. मी आशा करतो की, वाजपेयी यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न तुम्हा सर्वांना नक्की आवडणार आहे.”
ना शाहरुख…ना रजनीकांत…ना प्रभास, ‘या’ अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला!
मैं हू अटल या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केलंय. रवी जाधव याबाबत बोलत असताना म्हणााले की, मी लहानपणापासून अटल बिहारी वाजपेयी यांना फॉलो करत आलो आहे. त्यानी देशासाठी दिलेले योगदान रोज पाहिलंय. मी भाग्यवान आहे की, मला वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याची जीवनावरिल आधारित सिनेमाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली.