Pankaj Tripathi ला पितृशोक; वडील बनारस त्रिपाठींचं वृद्धापकाळाने निधन

Pankaj Tripathi ला पितृशोक; वडील बनारस त्रिपाठींचं वृद्धापकाळाने निधन

Pankaj Tripathi’s Father Passed Away : नुकतचं ओएमजी 2 मध्ये दमदार भूमिका साकरणारा अभिनेता पंकज त्रिपाठीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील बनारस त्रिपाठी यांचं वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बलसंड गावामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांची राऊतावर लायकी

पंकज यांचे आई-वडील बिहारमध्येच राहत होते. तर ते पत्नी आणि मुलांसह मुंबईत राहतात. त्यांच्या वडीलांच्या अत्यंत जवळ होते. त्यामुळे वडीलांच्या जाण्याने पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी ते स्वप्ननगरी मुंबईत आले आहेत. तर त्यांच्या वडीलांवर त्यांच्या गावीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Ahmedngar Urban Bank घोटाळ्यामध्ये सुवेंद्र गांधींसह देवेंद्र गांधींची चौकशी करा

मात्र त्यांच्या वडिलांना मुंबईतील धावपळीचं आयुष्य आवडत नव्हतं. म्हणून पंकज यांचे आई-वडील बिहारमध्येच राहत होते. तर ते पत्नी आणि मुलांसह मुंबईत राहतात. एका मुलाखतीमध्ये पंकज यांनी याबद्दल सांगितले होते. तसेच पंकज नेहमी आपल्या कामाबद्दल वडीलांना सांगत. की, चित्रपटसृष्टीत ते नेमकं काय काम करतात.

दरम्यान पंकज त्रिपाठी यांच्या ओएमजी 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘ओएमजी 2’ या सिनेमाने ११४.३१ कोटींचा गल्ला कमावला आहे. तसेच ‘ओएमजी-2’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या खिलाडीच्या ‘ओएमजी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. ओएमजी या सिनेमाला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. परंतु आता ओएमजी-2 या सिनेमाने देखील अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube