संभाजीराव पाटील निलंगेकरांना प्रचंड मतांनी विजयी करा, रामदास आठवलेंचे आवाहन
Ramdas Athawale : संविधान हेच भारतीय लोकशाहीचा खरा आधार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पसरवण्यात येत असलेले भ्रम आणि संविधानावर होत असलेले हल्ले या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निलंगा येथे ‘संविधान सन्मान सभा’ पार पडली. यावेळी, संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या, आपला स्वाभिमान हिसकावू पाहणाऱ्यांना घऱी पाठवा आणि संभाजीराव पाटील निलंगेकरांना (Sambhajirao Patil Nilangekar) प्रचंड मताने विजयी करा, असं आवाहन आठवलेंनी केलं.
संवैधानिक मुल्यांचा जयघोष करत भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवणे आणि त्याच्या सन्मानार्थ सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प सर्वांनी केला. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित देशभरातील नागरिकांच्या लेखांचा संग्रह असलेले ‘विचारधारा’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
Kishtwar Encounter : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, 3 जवान जखमी तर एक शहीद
‘संभाजीरावांनी हा एक अत्यंत देखणा असा कार्यक्रम घेतला असून निवडणुकीत नेत्यांचा, पक्षाचा प्रचार फार होतो. पण या सर्वांचा आधार असलेल्या संविधानाचा प्रचार मात्र कोणी करताना दिसत नाही. पण या कार्यक्रमामुळे लोकांना संविधान कळेल आणि संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसचा खरा चेहरा देखील कळेल, अशी भावना आठवलेंनी यावेळी व्यक्त केली.
कॉंग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचे पाप केले…
देशाच्या स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवाल्यांनी दोन वेळा डॉ. बाबासाहेबांना ठरवून पराभूत करण्याचे पाप केले आणि त्याच कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीमध्ये मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचा खोटा भ्रम पसरवून जनतेची फसवणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संविधानाचे खरे पाईक असून संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहनही आठवले यांनी केलं.
‘भारतीय जनता पक्ष हा कायमच भारतीय संविधानाने दाखवलेल्या मार्गावर चालत आला आहे. मोदींनी केलेला आहे तितका संविधानाचा आदर सन्मान कोणत्याही कॉंग्रेसवाल्यांनी केलेला नाही. उलट संविधानाच्या नावावर राजकारण करण्याचे फार मोठे पातक त्यांनी केले आहे. आज निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अशावेळी आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार बजावायचा आहे आणि या संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या, आपला स्वाभिमान हिसकावू पाहणाऱ्यांना परत त्यांची घरी पाठवून देऊया, अशी भावना आठवलेंनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी खा. अमर साबळे, माजी खा.डॉ. सुनिल गायकवाड, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी कांबळे आदींसह सर्व प्रमुख पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व संविधानप्रेमी जनता उपस्थित होती.