मतदारसंघाचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीने मतदान करा, संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आवाहन
Sambhajirao Patil Nilangekar : सलग 10 वर्ष अथक मेहनत घेऊन मतदार संघात विकासाची गंगा वाहती केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान व स्वाभिमानाने जगावा असे काम केले आहे.परंतु या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी विचारधारा मतदारसंघात कार्यरत असून आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी एकजुटीने महायुतीला मतदान करा,असे आवाहन माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी केले.
आ.निलंगेकर यांनी शुक्रवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान देवणी तालुक्यातील ममदापूर, चवणहिप्परगा,धोतरवाडी, आरसनाळ,कुमदाळ,होनाळी, सावरगाव,वागदरी,विजयनगर (गौडगाव),इंद्राळ,अंबेगाव, येणगेवाडी,टाकळी,बोंबळी खु., जवळगा,हिसामनगर व हेळंब येथे बैठका घेतल्या.चवण हिप्परगा व जवळगा येथे त्यांच्या सभा झाल्या.
ठिकठिकाणी उपस्थितांशी संवाद साधताना आ. निलंगेकर म्हणाले की,विकास प्रक्रियेमुळे मतदारसंघातील एकही नागरिक लाभांपासून वंचित राहिला नाही. विविध लोककल्याणकारी योजना प्रत्येकाला मिळत असून त्यामुळे सकारात्मक बदल घडत आहेत.महायुतीच्या वचननाम्यात विधायक घोषणा करण्यात आल्या आहेत,असेही ते म्हणाले.
निलंगा मतदारसंघातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्याने विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. भविष्यातही मतदारसंघासाठी पैसा कमी पडणार नाही. ही निवडणूक एका उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नाही तर मतदारसंघासह राज्यासाठीही महत्त्वाची आहे.भविष्यातील प्रगतीसाठी ती महत्त्वाची आहे. मतदारसंघाला रसातळाला घेऊन जाणाऱ्या अपप्रवृत्ती पासून सावध रहा,असे आवाहनही त्यांनी केले.
आ.निलंगेकर यांनी सांगितले की,तुमचे मत महिला सन्मान, शेतकरी हित,युवक कल्याण, वृद्धांना आधार,आरोग्य सुविधा, शिक्षण यासाठी महत्त्वाचे आहे. सरकारने वृद्धांना मिळणारा लाभ दीड हजारावरून 2100 करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिकांना वाढीव हमीभाव असे निर्णय सरकार घेत आहे. त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे.येणाऱ्या 20 तारखेस कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला आणि महायुतीला विजयी करा,असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी केले.
सीना नदीवर पूल बांधून शेकडो शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला : आ.संग्राम जगताप
या बैठकांना भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, माजी सभापती गोविंद चिलकुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील,माजी सभापती शंकर पाटील तळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे, प्रशांत पाटील दवण हिप्परगेकर, माजी सभापती सत्यवान कांबळे,बालाजीराव बिराजदार, माजी जिप सदस्य प्रशांत पाटील,सरपंच राज गुणाले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,निलंगा युवा सेना तालुकाप्रमुख प्रभात पाटील, सरपंच दिलीप भंडे,कल्याण हुपळे,शामसुंदर भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.