संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातच सर्वांगीण विकास झाला, भारतबाई सोळुंके यांचं प्रतिपादन

  • Written By: Published:
संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातच सर्वांगीण विकास झाला, भारतबाई सोळुंके यांचं प्रतिपादन

Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार (Sambhaji Patil ) संभाजीराव पाटील निलंगेकर  यांच्याकडे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद असतानाच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण लातूर जिल्हा आणि निलंगा मतदारसंघाचाही विकास झाला असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी केल आहे. त्या प्रचार सभेत बोलत होत्या.

उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे शिक्षण व आरोग्य विभागाची जबाबदारी होती. या दोन्हीही विभागात जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केले. त्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली. सोळुंके म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळे अनेक पिढ्या घडविण्याचे काम होते. त्या अनुषंगाने तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आम्हाला निर्देश दिले होते. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना लातूर जिल्ह्यात या काळात पटसंख्या वाढविण्यासाठी आम्ही विविध धोरणे आखली अशी माहितीही सोळुंके यांनी यावेळी दिली.

प्रत्येक घराचा शाश्वत विकास करण्यावर आमचा भर असणार; संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारांना शब्द

परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गुणवत्ता वाढीसाठी बाला उपक्रम राबविण्यात आला. विविध उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर आरोग्य विभागातील कामाची तर राज्य पातळीवर दखल घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आजवरच्या इतिहासात तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला. प्रत्येक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. आरोग्य केंद्रांच्या इमारतीवर सोलर सिस्टिम बसवत विजेसाठी सर्व केंद्र स्वयंपूर्ण करण्यात आली असंही त्या यावेळी म्हणाल्या.

शिक्षण आणि आरोग्य ही दोन्ही खाती अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला. त्याचा लाभ जिल्ह्यातील व निलंगा मतदारसंघातील हजारो नागरिकांना झाला.दूरदृष्टी असल्यामुळे हे सर्व शक्य झाले. त्यामुळे या निवडणुकीत निलंगा मतदारसंघातील नागरिकांनी भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी राहत त्यांना विधानसभेत पाठवावे, असं आवाहनही भारतबाई सोळुंके यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube