संजय राऊतजी…, कट्टर विरोधक नितेश राणेंची राऊतांसाठी भावूक पोस्ट
Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडल्याने
Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबात त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीच्या सुधारणेसाठी प्रार्थना करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.
तर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणारे नितेश राणे यांनी आता संजय राऊत यांच्यासाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केल्याने सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यासाठी एक्सवर लिहिले की, संजय राऊतजी… काळजी घ्या, लवकर बरे व्हा! असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली.
.@rautsanjay61 जी..
काळजी घ्या
लवकर बरे व्हा!
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 1, 2025
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती — जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं. मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागणार आहे. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवार्द असेच राहू द्या. अशी खासदार संजय राऊत यांनी ए्क्सवर माहिती दिली होती.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
बेकायदेशीर सभा अन् आदेशांचे उल्लंघन, ‘सत्याचा मोर्चा’ च्या आयोजकांवर पोलिसांची कारवाई
