तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना; संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत पंतप्रधानांचं ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून राऊत यांच्या तब्येतबद्दल काळजी वजा त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 31T184546.105

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची तब्येत सध्या बरी नाही. (Raut) त्याबद्दल त्यांनी स्वत: निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या या निवेदनानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून राऊत यांच्या तब्येतबद्दल काळजी वजा त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात. गेल्या काही वर्षांपासूनच्या घडामोडींनी हे दाखवून दिलंच आहे. कित्येक वर्षे एकमेकांसोबत राहणारे पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यात कटुता आली. परंतु, मोदींच्या ट्वीटमुळे राजकारण वेगळ आणि मैत्रिपूर्ण संबंध वेगळे अशी चर्चा होत आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे.

मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. त्यांचं हेच ट्विट रिट्विट करत पंतप्रधान मोदींनी राऊतांनी लवकरे बरे व्हावे यासाठी सदिच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांच्या या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा होऊ लागल्या आहेत.

follow us